Avimukteshwaranand On Malegaon bomb blast case : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील (Malegaon bomb blast case) सर्व ७ आरोपींची एनआयए कोर्टाने (NIA Court) निर्दोष मुक्तता केली. यासंदर्भात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद (Shankaracharya Avimukteswarananda) यांनी सगळे निर्दोष सुटत आहेत तर मग दोषी कोण? असा सवाल केला आहे. तसेच जर कोणी हिंदू आतंकवादी (Hindu terrorism) असेल तर त्याची पूजा करणार का?, असंही ते म्हणाले.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद बोरिवली येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मालेगाव बॉम्बस्फोट निकालाविषयी विचारले असता ते म्हणाले, सगळे निर्दोष सुटत आहेत, मग दोषी कोण आहे? इतक्या वर्षांनंतरही जर आपल्याला दोषी कोण आहे हे कळत नसेल तर हे यंत्रणांचं अपयश नाही का? मुंबईत बॉम्बस्फोट झाले, त्यात देखील सर्व निर्दोष सुटले आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातही सर्व आरोपींना निर्दोष सुटले, मग दोषी कोण आहे? हे बॉम्बस्फोट आपोआप झाले का? असा सवाल त्यांनी केला आहे.
मालेगाव स्फोटानंतर भगवा दहशतवाद हा शब्द चर्चेत आला होता. यावरही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी भाष्य केलं. आंतकवाद हा आंतकवाद असतो, त्याला कोणताही रंग नसतो. जर कोणी हिंदू आतंकवादी असेल तर त्याची पूजा करणार का? जर कोणी मुस्लिम आतंकवादी असेल तर त्याची देखील पूजा करणार का? त्यामुळं आतंकवाद हा आंतकवाद असतो. याकडे सरकारने यावर झिरो टॉलरन्स माध्यमातून पाहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
राहुल गांधी वेडे झाले आहेत त्यांना प्रशिक्षणाची गरज; मंत्री बावनकुळेंचा हल्लाबोल
गाईला राष्ट्रमातेचा दर्जा द्या
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून गाईला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी करणार आहे. महाराष्ट्र सरकारने गाईला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्य मातेचा प्रोटोकॉल निश्तित करावा, अशी देखील आमची मागणी आहे. जनतेने निवडून दिलेले सरकार आहे, त्यामुळे सरकारने लोकांच्या भावनांचा आदर करावा. गाय ही आपली माता आहे. जर कोणी तिची कत्तल करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.