मंत्रिपद गेलं, पण बंगला सुटेना, मुंडेंकडून 46 लाख रुपये भाडं वसूल करा; दमानियांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Anjali Damania : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे मंत्री असताना त्यांना वास्तव्यासाठी देण्यात आलेला ‘सातपुडा’ (Satpuda Bungalow) बंगला पुन्हा एकदा चर्चेत आला. मुंडेंचं मंत्रिपद जाऊन तब्बल पाच महिने उटलून गेले तरी, त्यांनी अद्याप शासकिय बंगला रिकामा केला नाही. यावरूनच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी प्रश्न उपस्थित केलेत.
Video : माझं अन् वाल्मिक कराडचं ‘त्या’ घटनेमुळ खटकलं; बाळा बांगरची वादळी खुलाशांची मुलाखत
सातपुडा हा बंगला 4667 चौ फुटाचा बंगला आहे, म्हणजे याच्या दंडाची रक्कम ही महिन्याला 200 रुपये चौ फुटाप्रमाणे, तब्बल पाच महिन्याची म्हणून 46 लाख रुपये इतकी होते, हा दंडाचा पैसांपैसा वसूल केला गेला पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद सोडलं, पण पुन्हा मंत्री म्हणून येण्याची हाव सुटत नाही. ४ मार्चला त्यांच्याकडून पदाचा राजीनामा घेतला गेला, आज ४ ऑगस्ट आहे. तब्बल ५ महिने उलटून गेले.
ह्या आधी ऑफिसच्या बाहेरची पाटी काढली नाही. ते प्रकरण लावून धरलं म्हणून पाटी काढली, आणि आता हे.
आता… https://t.co/t11PumuSST pic.twitter.com/JbbApyeBgq
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 4, 2025
दमानिया यांनी एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद सोडलं, पण पुन्हा मंत्री म्हणून येण्याची हाव सुटत नाही. ४ मार्चला त्यांच्याकडून पदाचा राजीनामा घेतला गेला, आज ४ ऑगस्ट आहे. तब्बल ५ महिने उलटून गेले. ह्या आधी ऑफिसच्या बाहेरची पाटी काढली नाही. ते प्रकरण लावून धरलं म्हणून पाटी काढली, आणि आता हे. शासकिय बंगला तब्बल ५ महिने खाली केला नाही. त्यांचं म्हणणं असे आहे की, आजारपणामुळे आणि मुलीच्या शाळेमुळे मुंबईत रहावं लागत आहे. जरूर रहा, पण माझ्या आणि सामान्य लोकांच्या कराच्या पैशांनी नाही. तो बंगाला हा शासकीय कामासाठी दिला जातो, असं दमानिया यांनी ठणकावलं.
शिवसेनेचा बाप मीच, कारण…; भाजप आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान, शिंदे गट आक्रमक
पुढं दमानिया म्हणाल्या, जर तुम्ही स्वाभिमानी असतात तर फुकटचं घर घेऊन राहिला नसतात. एक २BHK विकत नाहीतर भाड्यावर घेऊन राहिला असतात. खोटी कारणं दिली नसती.
खरंतर हा बंगला ४६६७ चौ फुटाचा बंगला आहे, म्हणजे ह्याच्या दंडाची रक्कम ही महिन्याला २०० रुपये चौ फुटाप्रमाणे, तब्बल पाच महिन्याची म्हणून ४६ लाख रुपये इतकी आजरोजी आहे. ह्या दंडाचा पैसांपैसा वसूल केला गेला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना हा दंड माफ करण्याचे अधिकार असतात, पण त्यांनी १ रुपया देखील करता कामा नये, अशी मागणी दमानिया यांनी केली.