Download App

Baba Siddiqui Death : मोठी बातमी! बाबा सिद्दीकींची गोळी झाडून हत्या

Baba Siddiqui Death : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.

  • Written By: Last Updated:

Baba Siddiqui Death : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षाही देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे.

माहितीनुसार, त्यांच्यावर तीन व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता.  12 ऑक्टोबर (शनिवारी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास  त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्या ऑफिस बाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला होता. मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.  माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्यावर एसआरए प्रकल्पातून गोळीबार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फटाके वाजवत असताना हा गोळीबार झाला. लिलावती रुग्णालयात झिशान सिद्दीकी तसेच अभिनेता संजय दत्त उपस्थित आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रुग्णालयात संपर्क साधला आहे. सध्या रुग्णालायचा परिसर कार्यकर्ते आणि समर्थकांनी भरला आहे.

कशी घडली घटना

माहितीनुसार, शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बाबा सिद्धिकी कार्यालयातून बाहेर पडले तेव्हा कार्यालयासमोर फटाके वाजवत होते. अचानक तीन जण गाडीतून उतरले आणि बाबा सिद्धिकी यांच्यावर तीन राऊंड फायर केले.

सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. या गोळीबारात बाबा सिद्धिकी यांना एक गोळी लागल्यानंतर सिद्दीकी खाली कोसळले. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आला होता.

‘तुमच्या छातीची हवा टाचणी मारून कमी करतो, सगळे मोदींचे गुलाम’, राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

तीन वेळा आमदार

काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम करत त्यांनी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी यांनी 1999, 2004 आणि 2009 मध्ये वांद्रे पश्चिममधून विधानसभेची निवडणूक जिंकली होती. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आशिष शेलार यांनी त्यांचा पराभव केला होता. नोव्हेंबर 2004 ते डिसेंबर 2008 या काळात ते कामगार, अन्न नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री होते.

follow us