सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
Uddhav Thackeray at Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्यात बोलताना आपलं सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारणार असल्याची मोठी घोषणा शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. तसेच या मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपलं सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारणार. छ. शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. ते आमचे दैवत असून होय आम्ही आमच्या देवऱ्यातही छ.शिवाजी महाराजांची पूजा करणार. जसे आम्ही जय श्रीराम म्हणतो तसं आम्ही जय शिवराय त्याच किंवा त्याहून मोठ्या आवाजात जय शिवराय म्हणणार असे ठाकरे म्हणाले. तसेच प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचा मंदिर बांधणार शिवाय राहणार नाही. त्यांच्या आयुष्यातील जे काही प्रसंग आहेत ज्याला पुरावे आहेत हे सगळे प्रसंग त्या मंदीरात आणि मंदिराच्या आजूबाजूला शिवचरित्र निमित्ताने किंवा त्यादृष्टीने कोरले जातील किंवा दाखवले जातील. असं देखील दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी तर अशी इच्छा आहे की, छ. शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशात सर्वप्रथम आरबार उभं केलं म्हणून ते आयएनएस शिवाजी वगैरे ते आल्याचे ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हात मी छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारीनचं पण, आपल्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभे राहिले पाहिजे. असेही ते म्हणाले.
तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शाह हे यावेळी महायुती म्हणत आहे. मागे शतप्रतिशत म्हणत होते. पहिला तुमचा भाजप सांभाळला. दहा दिवसांपूर्वी नागपूरला गेलो होते. मी शहरीबाबू आहे. पण गोरगरीबांना दहा रुपयात जेवण दिले आहे. नागपूरला मी गेलो होतो. मला शेतीमधील कळत नाही. पण शेतकऱ्यांचे अश्रू दिसतात. सोयाबीनला भाव नाही. बँका कर्ज देत नाही. संत्र्यांवर खोडकिडा पडला आहे. कापसाच्या बोंडावर गुलाबी आळी आली आहे.
‘तुमच्या छातीची हवा टाचणी मारून कमी करतो, सगळे मोदींचे गुलाम’, राऊतांचा फडणवीसांवर घणाघात
अमित शाह तुमच्या पक्षाला दाढीवाला खोड कीडा लागला आहे. तुमच्या बोंडावर गुलाबी आळी लागलीय. तुमच्या डोळ्यात देखत पोखरला जात आहे. काही सोयरसुतक नाही. सत्ताजिहाद पाहिजे फक्त कुणी बरोबर असो. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना अमित शाह यांच्यावर केली.