मोठी बातमी! बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार

Baba Siddiqui : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Written By: Published:
Baba Siddiqui

Baba Siddiqui : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. तीन व्यक्तींकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यांच्या मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस बाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला. मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसापूर्वी बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. तर येत्या काही दिवसात आमदार झिशान सिद्दीकी देखील अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube