Babajani Durrani : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडत इतर पक्षात प्रवेश करत आहे. तर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला (Congress) दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. माजी आमदार बाबाजानी दुराणी (Babajani Durrani) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCPSP) पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेत्यांच्या वितारांवर विश्वास ठेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया यावेळी माध्यमांशी बोलताना बाबाजानी दुराणी यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना बाबाजानी दुराणी म्हणाले की, काँग्रेस नेत्यांच्या विचारांवर विश्वास ठेऊन मी पक्षप्रवेश केला आहे. राजकारणात पुढे दोनच पक्ष राहणार आहेत. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. काँग्रेसने फुले शाहू आंबेडकर जाती धर्माला एकच डोळ्यातून पाहण्याच काम केलं आहे. राज्यात सध्या समाजात दरी निर्माण करण्याचे काम सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यावर मी पवारसाहेबांसोबत गेलो त्यांचं नेतृत्व मानणारा मी कार्यकर्ता आहे. असं पत्रकारांशी बोलताना बाबाजानी दुराणी म्हणाले.
तर दुसरीकडे आज मुस्लिम पक्षाचं नेतृत्व करायला पण पक्ष तयार नाहीत. आमचे नेते आता नितेश राणे यांना चोख उत्तर देतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परभणी जिल्ह्यात जिल्हापरिषदेत एक नंबरचा पक्ष होता. पण आता आम्ही काँग्रेसचा झेंडा तिथे रोवू असेही यावेळी बाबाजानी दुराणी म्हणाले.
महाराष्ट्र विकून खाण्याचं काम मुख्यमंत्री करत आहे : हर्षवर्धन सपकाळ
तर दुसरीकडे यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप संपूर्ण देशात अराजक्ता निर्माण होईल असं कुशासन कार्यरत आहे. पर्यावरणाला देखील वेठीस ठेवलं जात होत आपल्या जागतिक दृष्ठ्या कोंडीत पकडलं जात आहे. महाराष्ट्र विकून खाण्याचं काम मुख्यमंत्री करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात टोळी युद्ध सुरु आहे. याला विरोध करण्यासाठी बाबाजानी दुराणी यांनी पक्षप्रवेश केला आहे. अमित देशमुख हे मार्गदर्शक राहिले आहेत आमचे कायम. त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या प्रश्वभूमीवर महत्वाचं योगदान असणार आहे. असं पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
महाराष्ट्रात मतदार यादीत महा घोटाळा? निवडणूक आयोगावर बॉम्ब; राहुल गांधींनी दिला पुरावा