Bachhu Kadu Still displeased on farmers’ loan waiver after meeting with Government : माजी आमदार आणि प्रहार या संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. या दरम्यान राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे बच्चू कडू हे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सरकारकडून या मुद्द्यावर बैठक घेण्यात आली. त्यामध्ये समिती नेमण्याचे आश्वासन देण्यात आलं. मात्र तरी देखील बच्चू कडू यांची नाराजी कायम आहे.
शिंदेंच्या मंत्र्यांचं ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण; डिनर डिप्लोमसीने राजकीय चर्चांना उधाण
यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयासह इतरही समस्यांवर मॅरेथॉन बैठक झाली. त्यासाठी सरकारचे आभारी आहोत. कर्जमाफीबाबत समिती नेमून अधिवेशनाच्या आत ही कर्जमाफी जाहीर केली जाईल. असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे. मात्र तरी देखील ही कर्जमाफी कधी होईल? याची तारीख जाहीर करण्यात आली नसल्याने जोपर्यंत ही सर्व आश्वासनं कागदावर येत नाही. तोपर्यंत आमचे आंदोलनाची भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे.
मोठी बातमी, भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोर गोळीबार; 1 जण जखमी
त्याचबरोबर त्यांनी यावेळी कांदा नाफेर्डने खरेदी केला पाहिजे. याबाबत केंद्रीय नेतयाशी चर्चा केली त्या निर्णयचा फायदा शेतकऱ्याला होईल. मेंढपाळाला चाराचरायला जागा नव्हती. यात महसूल जमीन आणि वन जमीन यांना चाराबंदी राहणार नाही.एखादा मेंढपाळ जनवाराच्या हल्यात मृत्यू पावला तर त्याला शसनाकडे मदत होईल. कर्ज माफीबाबत समिती नेमून अधिवेशनाच्या आत जाहिर करू असे म्हणाले.
…म्हणून अचानक ट्रेंडिंगला आली प्रियंका चोप्रा; नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव
दिव्यांगाच्या मानधनत वाढ होईल असे आश्वासन दिले. मेंढपाळाचा निर्णय झाला तर एतिहासिक होईल. पैसे नसतील तरदिव्यांग शेतकरी आहे किंवा एकल शेतकरी आहे त्याल पेरणीपर्यत कापणी पर्यंत योगदान द्यावे. 3/5 फळ उतपादक शेतकरीचा खर्च वाडत चालला त्याचं होणारं नुकसान मोठं आहे. हमी भाव देता येत नसेल तर उत्पादन खर्च कमी करावा. गाईसाठी नेपाळमध्ये गाईच्या खताला सबसिडी दिली जाते.भेसळयुक्त दुधाचा कायदा या अधिवेशनात येईल. राज्यात उत्पादन होणाऱ्या दुधाची क्षमता यात मागणी पुरवठा ही दुधारी तलवार आहे.आमच्या कायद्याने दुधाचे दर वाढतील.
खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत वस्तू व सेवा कर दिन मोठ्या उत्साहात साजरा
या अधिवेशनात किंवा पुढील अधिवेशनात होईल.कर्जमाफीची तारीख जाहिर केली पाहिजेच. ग्रामपंचायत आणि मत्व्यवसायबाबत स्वतंत्र बैठक होईल. उसाच्या काटेमारीत गफलत होऊ नये उसाचे पैसे दोन दोन वर्ष दिले जात नाहीत त्यावर नियम आले पाहिजेत. या निर्णयात दिव्यांगाचं ६ हजाराचं मानधन इतर निर्णय कागदावर यायला हवे.जो पर्यंत ते कागदावर येत नाही तो परयंत आमची आंदोलनाची भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.मिटिंग घेऊन आश्वासित केल असलं तरी कागदावर यायला हवं.
भारतीय कर्णधार शुभमन गिलचा नवा कारनामा; मोडला किंग कोहलीचा ‘तो’ विक्रम
बच्चू कडू मेला तरी बेहत्तर पण अन्याय बेईमानी सहन करणार नाही. माझावर 350 गुन्हे आहेत सरकारकडून कसं करून घ्यायच़ यात मी माहिर आहे. सरसकट गरीबाची कर्ज माफी झाली पाहिजे. कोकाटे बाहेर काय बोलले ते वेगळं मात्र मिटिंगमध्ये चांगली भूमिका घेतली. त्यांनी पून्हा असं वक्तव्य करू नये नाहीतर आम्हीही मेलो नाही.