Badlapur School Case : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला फाशी देण्यात यावी या मागणीसाठी गेल्या 8 तासांपासून नागरिक बदलापूर रेल्वे स्टेशनवर (Badlapur Railway Station) आंदोलन करत आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बदलापूर रेल्वे स्टेशनवर हजारो आंदोलक आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी आंदोलन करत होते. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पुन्हा एकदा लाठीचार्ज करण्यात आला आहे.
बदलापूर रेल्वे स्टेशनवर हजारो आंदोलक आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी आंदोलन करत होते. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पुन्हा एकदा लाठीचार्ज करण्यात आला आहे. आंदोलकांनी हे आंदोलन मागे घ्यावा यासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रयत्न केला होता.
गिरीश महाजन (Girish Mahajan) तब्बल एक तास आंदोलकांशी चर्चा करत होते मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे सायंकाळी 6 च्या सुमारास बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलकांना पांगवलं. सध्या पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
तसेच सरकारने या प्रकरणात पहिली कारवाई करत गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयाकडून देण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
बदलापूरमध्ये (Badlapur Case) अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
बदलापूर घटनेनंतर राज ठाकरेंचे मनसैनिकांना थेट आदेश; म्हणाले, आरोपीला…
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे.