Download App

बदलापुरातील तीनशे आंदोलकांवर गुन्हे, 28 जणांना अटक, इंटरनेटही बंद; आज स्थिती काय?

पोलीस प्रशासनाने पुढील कारवाई करत 300 ते 400 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 28 जणांना अटकही केली आहे. 

Badlapur Crime : बदलापुरातील नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवरील अत्याचाराच्या (Badlapur Crime) घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर बदलापुरातील नागरिक कमालीचे संतापले (Maharashtra) होते. काल त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानक आणि (Railway Station) संबंधित शाळेबाहेर जोरदार आंदोलन केले.  काही वेळानंतर मात्र या आंदोलनांना हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आंदोलकांनी ऐकलं नाही. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा मारा करण्यात आला. यानंतर चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक केली. यामुळे पोलीस प्रशासनाने पुढील कारवाई करत 300 ते 400 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 28 जणांना अटकही केली आहे.

बदलापूर प्रकरण, महिला पत्रकारांशी बोलताना वामन म्हात्रेंची जीभ घसरली, म्हणाले, तुझ्यावरच बलात्कार  

आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. तरी देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज इंटरनेट बंदच ठेवण्यात आले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 28 जणांना अटक करण्यात आली आहे. रेल्वे रोको, सरकारी कामात अडथळा, दगडफेक आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न अशा विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत. अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

प्रकरण काय?

बदलापूरमधील (Badlapur) एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आंदोलकांनी काल सकाळी साडेसहा वाजता शाळेबाहेर आंदोलन सुरु केले आणि त्यानंतर सकाळी साडे दहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन केले होते. या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत पांगवलं तसेच काही आंदोलकांची धरपकड देखील पोलिसांकडून करण्यात आली आहे. आज येथे तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. कोणताही  गैरप्रकार घडू नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे राज्य सरकारने या प्रकरणात कारवाईची सुरुवात करत तीन पोलीस अधिकाऱ्यांना (Badlapur Police) या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याने निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या पुढील तापासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. एसआयटी स्थापन केल्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने होईल असे सांगण्यात आले.

Video: आता बस्स झालं! यांना चिरडून मारा; बदलापूर अत्याचार प्रकरणावर आमदार शिरसाट संतप्त

follow us