Bajaj Auto non-executive director Madhur Bajaj passes away : बजाज ऑटो लिमिटेडचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि माजी उपाध्यक्ष मधुर बजाज यांचे शुक्रवारी (दि.11) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. बजाज यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान रूग्णालयात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी जानेवारी 2024 मध्ये बजाज ऑटोच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
मधुर बजाज यांचा अल्प परिचय
१९७३ मध्ये सिडेनहॅम कॉलेज, मुंबई येथून बी. कॉम पदवी प्राप्त केल्यानंतर, त्यांनी १९७९ मध्ये स्वित्झर्लंडमधील लॉसाने येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (आयएमडी) येथे एमबीए केले. मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी मधुर बजाज यांना इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी ऑफ इंडियाकडून ‘विकास रतन’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मधुर बजाज सध्या बजाज फिनसर्व्ह लिमिटेड, बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि बजाज ग्रुपच्या इतर अनेक कंपन्यांचे संचालक म्हणून काम पाहत होते.
We are deeply saddened by the passing of our beloved advisor – Shri Madhur Bajaj – a man whose humility, wisdom, and quiet leadership left an indelible mark on all who knew him.
As one of the advisors to I.I.M.U.N. since the very inception of our Advisory Board in 2017, he stood… pic.twitter.com/3LCYCm7dq8
— I.I.M.U.N. (@iimunofficial) April 11, 2025
आयआयएमयूएनने व्यक्त केला शोक
इंडिया इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्सने (IIMUN) मधुर बजाज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बजाज यांच्या निधनाबद्दल IMUN ने म्हटले आहे की, “आमचे प्रिय सल्लागार श्री. मधुर बजाज यांच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे. एक अशी व्यक्ती ज्यांनी त्यांच्या नम्रता, विस्डम आणि शांत नेतृत्वाने त्यांना ओळखणाऱ्या सर्वांवर अमिट छाप सोडली. २०१७ पासून आमच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी तरुण नेत्यांना उद्देश आणि सचोटीने मार्गदर्शन केल्याचे इंडिया इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्सने त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
I am deeply saddened and shocked by the passing of noted industrialist, former Vice-Chairman of Bajaj Auto, and my dear friend, Madhur Bajaj.
There is no doubt that the Bajaj Auto plant at Waluj in Chhatrapati Sambhajinagar played a pivotal role in ushering in rapid growth and… pic.twitter.com/lAw4Aw8pRI
— Rajendra Darda (@RajendrajDarda) April 11, 2025