जेलमधून वाल्मिक कराडने सूत्रे हलवली; बजरंग सोनवणेंनी रेकॉर्डिंग ऐकवली, ‘माझ्या मुलाला विलास घुले प्रकरणात अडकवण्याचा कट’

Bajrang Sonawane; विलास घुले हत्या प्रकरणात बजरंग सोनवणेंनी वाल्मीक कराडवर गंभीर आरोप करत जेलमधील फोनची ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवली.

Bajrang Sonawane on Vilas Ghule Murder Case

Bajrang Sonawane on Vilas Ghule Murder Case

Bajrang Sonawane on Vilas Ghule Murder Case: बीडच्या विलास घुले प्ररकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बंजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन वाल्मीक कराडवर गंभीर आरोप केलेत. वाल्मीक कराड याने जेलमधून सुग्रीव कराडला फोन करुन सांगितले की, माझा मुलगा सौरभ सोनवणे याला या प्रकरणात अडकवण्यासाठी वाटेल त करा. असे आरोप बंजरंग सोनवणे यांनी केलेत. 21 जून रोजी बीडच्या टाकळी येथील विलास घुले या तरुणाची हत्या करण्यात आली होती. विलास घुलेच्या कुटुंबीयांनी बीडचे खासदार बंजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. मात्र बंजरंग सोनवणे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणातून आंदोलनेही करण्यात आली होती. ही आंदोलने वाल्मीक कराडने करायला लावली, असाही आरोप सोनवणे यांनी केला.

‘नवं कर्ज घेऊ नका, 3 वर्षांचा खर्च बाजूला ठेवा’; राहुल गांधींच्या गुंतवणूक सल्लागाराचा मोठा सल्ला

जेलमधून वाल्मीक कराडने सुग्रीव कराडला फोन केला. या फोन कॉलची ऑडिओ क्लिपही सोनवणे यांनी ऐकवली. विलास घुले हत्या प्रकरणात आपल्या मुलाला अडकवण्याचा कट असल्याचा दावा त्यांनी या क्लिपद्वारे केला. तसेच विलास घुलेचा मृतदेह पोलिस ठाण्याच्याबाहेर ठेवून आंदोलन करणे, रास्ता रोको करणे अशा सुचना वाल्मीक कराडने जेलमधून दिल्या. त्यामुळे वाल्मीक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यावर कडक करावाई करावी अशी मागणी आता खासदार बंजरंग सोनवणे करत आहेत.

या प्रकरणातून मला बदनाम करण्याचा कट सुरु आहे. जेव्हा 20 तारखेला विलास घुलेची हत्या झाली. आम्हाला या घटनेबाबत माहीतीही नव्हती, मात्र 21 तारखेला दाखल झालेल्या ‘एफआयआर’मध्ये माझ्या मुलाचे नाव नव्हते. हा कट कोणी रचला याचीही ऑडीओ क्लिप मी ऐकवणार आहे. माझी बदनामी करणाऱ्या 12 ते 13 लोकांवर मी 500 कोटींचा दावा ठोकणार आहे. असेही बजरंग सोनवणे म्हणाले.

मुंबईत मृत्यूनंतर चार वर्षे फ्रीझरमध्ये जतन केला मृतदेह, अमेरिकेत क्रायोनिक्ससाठी पाठवण्याचा कुटुंबाचा प्रयत्न

बजरंग सोनवणे कधीच चोरी करत नाही. या प्रकरणाचं चुकीचं प्रझेंटेशन केलं जात आहे. या प्रकरणाचं मुळ तपासायला हवं. या प्रकरणातील एक आरोपी सोडून बाकी मी कुणालाही ओळखत नाही. माझ्या मुलाचा या प्रकरणात काहीही संबंध नाही. माझ्या मुलाचं नाव पुरणवी जबाबात का घेतलं याचं उत्तर एसपींना द्यावं लागेल. विलास घुले खून प्रकरणाचा कट वाल्मीक कराड, सुग्रीव कराड यांनीच रचला. वाल्मीक कराड 32 मोबाईल वापरतो. त्याने 20 मोबईलवर बोलल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. कराड वापरत असलेले सिम गुन्हेगारांच्या नावावर आहे. आता या सर्व प्रकरणाबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असे सोनवणे म्हणाले.

तर या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंबाबत बोलताना सोनवणे म्हणाले, मी धनंजय मुंडेसाठी दोन वेळा रडलो, माझ्या कारखान्याचं भूमिपूजन धनंजय मुंडेंच्या हस्ते केले. त्यांना विधान परिषद मिळावी म्हणून मी गोपीनाथ मुंडेंचे पाय धरले. तसेच 2014 च्या निवडणुकीत धनंजय मुंडेंना मी आर्थिक मदतही केली. तसेच धनंजय मुंडेंनी खासदार होण्यासाठी मलाही मदत केली, असे सोनवणे म्हणाले.

सेमीफायनलमध्ये भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, एशियन गेम्सच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानशी होणार लढत

दरम्यान, विलास घुले प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्याचा कट सुरु आहे. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल तपासणी करुन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

Exit mobile version