Namo Maharojgar Melava 2024 Baramati : बारामतीमध्ये आज (दि.2) नमो महारोजगार मेळावा पार पडला. यात फडणवीसांनी बारामतीकरांसमोर कोपरखळ्या मारत अजितदादांनी कितीही चांगलं काम केले तरीही गृहखातं देणार नाही असे स्पष्ट विधान केले. विशेष म्हणजे यावेळी मंचावर एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेदांमुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. राज्यामध्ये होत असलेल्या नमो महारोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
आता काही लोक माझ्या पाठीमागे लागणार आहेत, की माझं पोस्टिंग बारामतीलाच करा. कारण चांगलं कार्यालय आणि चांगलं निवासस्थान बारामतीला जर मिळत आहे. मी दादा तुम्हाला एक विनंतीकरतो, तुम्ही स्वतः लक्ष घालून इतक्या चांगल्या इमारती बांधल्यात आहेत, आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, त्याचा पीएमसी म्हणून तुम्हाला नियुक्त करावं, म्हणजे सगळ्या इमारती उत्तम होणार आहेत. यावरून दादा मला हळूच म्हणू शकतील, की पीएमसीच का, खात माझ्याकडे द्या.. परंतु ते देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवणार, असं फडणवीस म्हणाले.
गेल्या काही दिवसापूर्वी हा मेळावा घोषित झाल्यापासून माध्यमांना एक उद्योग मिळाला आहे. माध्यमाचे सर्वच प्रतिनिधी कामाला लागले आहे. त्यामुळे त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आमच्या या मेळाव्याला त्यांनी मोठी प्रसिद्धी गेल्या दोन-तीन दिवसात मिळवून दिली. पुढे म्हणाले की, महारोजगार मेळाव्यात 55 हजार पदे अधिसूचित करण्यात आली. एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगांना मानव संसाधनाची आवश्यकता आहे. तर आपण जर विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएट्सला किंवा तरुणाईला विचारलं त्यांच्या नेमक्या अडचण काय आहे ते सतत सांगतात की आम्हाला रोजगार हवा आहे.
अजितदादांसाठी पवारांची घालमेल; नजर खिळवून ठेवली तरी दादांनी…
पुढे म्हणाले की, आम्ही जे राजकारणात काम करणारे लोक आहोत, आम्ही सर्व कंत्राटी कामगार आहोत. आम्हाला दर ५ वर्षाला आपला कंत्राट जो आहे, तो त्याठिकाणी रिनिव्ह करावा लागतो. चांगलं काम केलं तर आमचं कंत्राट रिनिव्ह होत. चांगलं काम केलं नाही तर लीक आम्हाला घरी बसवतात, पण या ठिकाणी मात्र जो रोजगार देण्याचा जो प्रयत्न करतोय, चांगलं काम करत राहिलात तर जन्मभर तुमची त्यात प्रगती होणार आहे, तुम्हाला वरवरचं जाता येणार आहे. तुम्हाला मोठंच होता होणार आहे, अशा प्रकारचा हा महारोजगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. नमो महारोजगार मेळाव्याला सरकारमधील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह शरद पवार, सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती होती. तसंच डॉ. नीलम गोऱ्हे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत यांचीही मंचावर उपस्थिती होते.