Download App

बारसू रिफायनरीसाठी शिंदे-फडणवीस सरकारचं एक पाऊल…

बारसू रिफायनरीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आलं आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात एक महत्वाची बैठक घेण्यात येणार असून विशेषत: या बैठकीला प्रकल्पग्रस्तांनी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. याबाबत अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नसून विश्वसनीय सुत्रांनी स्पष्ट करण्यात आलं आहे.

हिजाब वादात चर्चेत आलेली मुलगी बोर्डात टॉपर, शशी थरुर यांनी थोपटली पाठ

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सादर झाल्यानंतर बैठकीसंदर्भात जाहीर करण्यात येणार आहे. बारसू रिफायनरीच्या बैठकीसाठी प्रशासकीय अधिकारी, एमआयडीसी विभागाचे अधिकारी, पोलिस प्रशासनासह, प्रकल्पग्रस्तांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत बैठक घेणार आहेत.

या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याबाबत अद्याप कुठलाही तपशील मिळालेला नसून बारसू रिफायनरी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारकडून रणनीती आखली जात असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरकीडे रत्नागिरीच्या भुमिपुत्रांकडून या प्रकल्पाविरोधात आक्रमक पद्धतीने विरोध करण्यात येत असल्याचं दिसतंय. भूमिपुत्रांसह जिल्ह्यातील महिलांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Letsupp Special : Barsu Refinery वरून उद्धव ठाकरेंची कोंडी? पवारांची भूमिका ठाकरेंना पुन्हा अडचणीत आणणार?

हा प्रकल्प होणार की नाही? याबाबत उद्योगमंत्री उदय सामंतांनी स्पष्ट केलं असून सामंत म्हणाले, रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यासाठी जमिनीच्या मातीची तपासणी केली जात असल्याचं सामंतांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, वेळ पडल्यास प्रकल्पग्रस्तांसह राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊनच आम्ही बारसू प्रकल्पाबाबत निर्णय घेणार असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. याबाबत अधिकृतपणे माहिती मिळाली नसून विश्वसनीय सुत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.

रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन राज्यात सध्या चांगलंच राजकारण पेटल्याचं दिसून येतंय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रिफायनरीच्या मुद्द्यावरुन वाकयुद्ध सुरु आहे. अशातच विरोधकांनी मतांसाठी राजकारण करु नये, असं आवाहन उदय सामंतांकडून करण्यात आलं आहे.

Tags

follow us