हिजाब वादात चर्चेत आलेली मुलगी बोर्डात टॉपर, शशी थरुर यांनी थोपटली पाठ

हिजाब वादात चर्चेत आलेली मुलगी बोर्डात टॉपर, शशी थरुर यांनी थोपटली पाठ

 Karanatak Tabassum Shaikh : कर्नाटकची विद्यार्थिनी तबस्सुम शेख हिने 12वीच्या बोर्ड परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. कर्नाटक प्री युनिव्हर्सिटी एज्युकेशन डिपार्टमेंटने घेतलेल्या PUC-दुसरी परीक्षेत (12वी) तबस्सुमने सर्वाधिक गुण मिळवले. यावर्षी ती 600 पैकी 593 गुण मिळवून स्टेट आर्ट्स टॉपर आहे. हिंदी, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात 100 पैकी 100 गुण तिला मिळाले आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही तबस्सुमचे कौतुक केले आणि यशापेक्षा चांगला बदला नाही असे म्हटले आहे.

तबस्सुमच्या यशाने तिचे आई-वडील खूप खूश आहेत पण हे सर्व इतके सोपे नव्हते. वर्षभरापूर्वी तबस्सुम गोंधळलेल्या अवस्थेतून जात होती. भाजपच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने गेल्या वर्षी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी घातली होती. अशा परिस्थितीत 18 वर्षीय तबस्सुमला प्रश्न पडला की तिने तिच्या अभ्यासाला प्राधान्य द्यायचे की धार्मिक श्रद्धा पाळायची. मात्र, हिजाबपेक्षा शिक्षणाची निवड करून तबस्सुमने एक आदर्श घालून दिला आहे.

दिल्लीत महानगरपालिकेवर आपचे पुन्हा वर्चस्व, महापौरपदी आपच्या शैली ओबेरॉय यांची बिनविरोध निवड

काँग्रेस नेते आणि केरळचे खासदार शशी थरूर यांनीही तबस्सुमची कहाणी ट्विट केली आहे. तबस्सुमचा तिच्या पालकांसोबतचा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, ‘यश हा सर्वोत्तम बदला आहे.

गेल्या वर्षी, हिजाब बंदीचा मुद्दा जेव्हा चर्चेत आला तेव्हा उडुपीमधील सरकारी पीयूसीच्या सहा विद्यार्थिनींनी दावा केला की त्यांना हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी दिली नाही. यानंतर कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते.

तबस्सुमने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “राज्य सरकारच्या आदेशानंतर, जेव्हा ती कॉलेजमध्ये गेली तेव्हा ती घरातून बाहेर पडताना हिजाब घालायची आणि कॅम्पसमध्ये प्रवेश करताना नियम पाळायची. माझ्या कॉलेजने एक वेगळी खोली नियुक्त केली होती जिथे मी वर्गात जाण्यापूर्वी माझा हिजाब काढायची”, असे तिने म्हटले आहे. मात्र, शुक्रवारी तबस्सुम हिजाब घालून तिच्या पीयूसीमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांना भेटण्यासाठी गेल्यावर, तिच्यावर कोणीही आक्षेप घेतला नाही, असे तिने सांगितले आहे.

मुख्यमंत्री योगींना धमकावण्यासाठी प्रेयसीच्या वडिलांचा मोबाईल चोरला…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube