Mahadev Munde Post Mortem Report : बीड (Beed) जिल्ह्यातील परळी येथे जवळपास 20 महिन्यांपूर्वी व्यापारी महादेव मुंडे यांची अमानुष पद्धतीने हत्या झाली होती. मात्र, इतका कालावधी उलटल्यानंतरही या हत्याकांडातील एकाही आरोपीला अटक करण्यात (Mahadev Munde Post Mortem Report) आलेली नाही. आता या प्रकरणाचा शवविच्छेदन (PM) अहवाल समोर आलाय. त्यातून या हत्येच्या थरारक आणि (Beed Crime) अत्यंत क्रूर घडामोडींचा पर्दाफाश झाला आहे.
श्वसननलिकेपासून मानेपर्यंत वार
महादेव मुंडे यांची हत्या केवळ एक अपघात नव्हे, तर ती एका नियोजित, क्रूर कटाचा भाग असल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट होते. त्यांच्या श्वसननलिकेला कापण्यात आले होते. याशिवाय मुख्य रक्तवाहिन्या खोल वारांमुळे तुटल्या होत्या. शरीरावर एकूण 16 वार करण्यात आले होते. त्यामध्ये मानेवर, तोंडावर, दोन्ही हातांवर आणि छातीवर गंभीर स्वरूपाचे जखमा झाल्याचे नमूद आहे. पीएम अहवालातील आकडेवारी अंगावर काटा आणणारी आहे. मुंडेंच्या गळ्यावर झालेला एक वार तब्बल 20 सेमी लांब, 8 सेमी रूंद, आणि 3 सेमी खोल होता. मानेच्या उजव्या बाजूने चार वार झाले होते. याशिवाय तोंड, नाक, कान, हात आणि छाती अशा शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा झाल्या होत्या. विशेष म्हणजे, या हल्ल्यादरम्यान महादेव मुंडेंनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता, हे त्यांच्या हातांवर असलेल्या वारांवरून स्पष्ट होते.
शेवटच्या क्षणांपर्यंत मृत्यूशी झुंज
महादेव मुंडेंनी हल्लेखोरांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. त्यांच्या डाव्या गुडघ्यावर खरचटलेली जखम होती, जी ते खाली कोसळल्याचा पुरावा देत होती. त्यांचे दोन्ही हात अंगठ्याजवळ, तळहातावर आणि बोटांवर वार झाले होते, जे प्रतिकाराच्या प्रयत्नांचे चिन्ह आहेत.
पुढील 4 दिवस महत्वाचे! राज्यात मुसळधार पावसाचा कहर, 10+ जिल्हे हाय अलर्टवर
कुठे आणि किती वार?
– गळा कापण्यात आला, उजव्या बाजूला 4 वार
– तोंड ते कानापर्यंत – 1 खोल वार
– उजव्या हातावर – 3 वार
– डाव्या हातावर – 3 वार
-तोंडावर – 1 वार
– नाकावर – 1 वार
– गळ्यावर – 3 वार
– एकूण 16 वार, शरीर रक्ताने माखलेलं
आरोपी अद्याप फरार
या खुनाच्या तपासाला 18 महिने उलटून गेले तरीही एकही आरोपी अटकेत नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. मृत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आरोप केला आहे की, भाजपचे मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मीक कराड याने फोन करून पोलिस तपास थांबवण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्याय मिळावा म्हणून अनेक वेळा प्रशासनाची दारे ठोठावली. मात्र न्याय न मिळाल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणातील दिरंगाई आणि राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर होत आहे.