मोठी बातमी! भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होणार?, शिंदे तटकरे अन् गोगावलेंच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती

अनेकदा शिवसेनेच्या नेत्यांनी भरत गोगावलेंकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी केली होती.

News Photo   2026 06 23T173655.047

मोठी बातमी! भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होणार, शिंदे तटकरे अन् गोगावलेंची बंद दाराआड चर्चा

रायगडच्या पालकमंत्रीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. (Gogawale) शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बैठक पार पडली. यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर आता भरत गोगावले यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही काळापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत रस्सीखेच सुरू आहे. याआधी अनेकदा शिवसेनेच्या नेत्यांनी भरत गोगावलेंकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज मुंबईत भरत गोगावले, सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यात भरत गोगावलेंकडे पालकमंत्रीपद देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

खासदार निधीबद्दल वेगवेगळे आरोप; माध्यमांसमोर येत ओमराजे निंबाळकरांनी हिशोबच मांडला

काय म्हणाले सुनील तटकरे?

रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बोलताना सुनील तटकरे यांनी म्हटले की, रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय लवकरच संपुष्टात आणू. आजच शिंदे साहेबांशी चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बसून हा विषय सुटेल आणि त्याला अंतिम स्वरूप दिला जाईल. ज्यावेळी माझ्यासारखी व्यक्ती हा विषय संपला असं बोलते त्यावेळी सामुच्चाराने यावर निर्णय होईल. महायुती म्हणून राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना एकत्रित बसून या संदर्भात निर्णय केला जाईल.

रायगडच्या प्रश्न सुटणार -शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल. सुनील तटकरे आणि भरत गोगावले या दोघांनी चर्चा केलेली आहे. मीही मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे. त्यामुळे हा तिढा लवकरचं सुटेल. दरम्यान, आता जवळपास सर्वच नेत्यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार असं म्हटलं आहे. त्यामुळे आता रायगडला लवकरच नवा पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version