खासदार निधीबद्दल वेगवेगळे आरोप; माध्यमांसमोर येत ओमराजे निंबाळकरांनी हिशोबच मांडला

खासदार विकास निधी आणि विकासकामांचा दावा करत असताना दुसरीकडे या खासदारांनी मिळालेल्या खासदार निधीचा पुरेपूर वापरच केलेला नसल्याचं समोर आलं आहे.

News Photo   2026 06 23T155840.012

शिवसेना ठाकरे गटाच्या सहा (MP) आमदारांनी बंडखोरी केल्यानंत राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या सर्व सहा खासदारांनी विकास कामं रखडत होती, निधी कमी पडत होता, असे कारण देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. जनतेच्या हितासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचेही बंडखोर खासदार सांगत आहेत. दरम्यान, यांना किती निधी मिळाला आणि किती खर्च केला याची आकडेवारी समोर आली आहे. त्यावर आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

एकीकडं खासदार विकास निधी आणि विकासकामांचा दावा करत असताना दुसरीकडे या खासदारांनी मिळालेल्या खासदार निधीचा पुरेपूर वापरच केलेला नसल्याचं समोर आलं आहे. याच मुद्द्याला समोर आणून खासदारांनी नेमकी बंडखोरी का केली? बंडखोरीचे फक्त कारण दिले जात आहे? असा आरोप ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जात आहे. दरम्यान, आता यावरच बंडखोरी केलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ओमराजे यांनी मिळालेल्या खासदार निधीची माहिती दिली आहे.

आधी भाजपला मतदान, मग शिंदे गटात प्रवेश! ओमराजे निंबाळकरांनी महाविकास आघाडीला दगा दिला का?

खासदार निधीवरून वेगवेगळे आरोप केले जात असताना ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिक मांडली तसेच खासदार निधी आणि त्याचा वापर कसा केला, याविषयीही त्यांनी सविस्तर सांगितले. माझ्या मतदारसंघात किती निधी मिळाला, याची माहिती वाहिन्या देत आहेत. माझ्या मतदारसंघाला 18 कोटी रुपये खासदार निधी प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. माझ्या मतदारसंघात 130 कामे आहेत जी प्रस्तावित आहेत. त्यातील 21 कामे पूर्ण झाली आहेत आणि त्याचा निधी वितरित झाला आहे, असे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

तसेच, बाकीची कामे प्रगतीपथावर आहेत. खासदार निधीवरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. मी 2019 ते 24 मी खासदार होतो. खासदार निधी खर्च करण्याची मुदत 5 वर्षांची असते. त्यामुळे कुठल्याही निधीचे मुल्यमापन करत असताना या निधीली किती वर्षाची मुदत आहे, ते पाहिले पाहिजे. मुदत संपल्यानंतर निधी शिल्लक राहिला तर निश्चितपणे संबंधित खासदाराचे अपयश आहे.

मुद्दा दोन पाच वर्षात मला 2019 ते 24 या काळात जो खासदार निधी मिळाला त्यातील एकही रुपया शिल्लक नाही. निधीतील एक रुपयाही अखर्चित राहिलेला नाही, असेही ओमराजे यांनी स्पष्ट केले. पुढं बोलताना, माझ्या लोकसभेत येणाऱ्या बुथची संख्या 2475 एवढी आहे. एका वर्षात खासदार निधी पाच कोटी रुपये मिळतो. पाच वर्षात 25 कोटी निधी झाला. 25 कोटी खासदार निधीला 2475 बुथने भागले तर एका बुथला एका बुथला 1 लाख 3000 रुपये मिळते. एका लाखात कोणते काम होते, हे मला सांगा, असा सवालही त्यांनी केला.

follow us