Vishwajit Kadam Sister Bharti Lad Passes Away : महाराष्ट्राचे माजी वनमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या कन्येचे निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. भारतीताई महेंद्र लाड (Kadam) यांच्या अकाली मृत्यूने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. पतंगरावांचे सुपुत्र आणि माजी मंत्री, काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
विश्वजीत कदम यांची पोस्ट
काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी ‘एक्स’ ट्वीटरवर ताईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. माझी मोठी बहीण आदरणीय भारतीताई महेंद्र लाड यांचं निधन झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद व वेदनादायी आहे. आजवरच्या वाटचालीत त्यांचं पाठबळ, प्रेम आणि स्नेह नेहमीच ऊर्जादायी राहिले. त्यांच्या निधनाने कदम व लाड परिवाराची कधीच न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आदरणीय ताईला भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जेव्हढ तुमच्या देशाचं बजेट तेवढं भारताच्या लष्कराचं.. असदुद्दीन ओवैसींचा पाकिस्तानवर थेट वार
पतंगराव कदम यांचे 9 मार्च 2018 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. प्रदीर्घ आजारानंतर अवयव निकामी झाल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. पतंगराव कदम यांना चार लेकरं होती. यापैकी अभिजीत कदम यांचे यापूर्वीच निधन झालं आहे. तर आता भारती लाड यांनीही अखेरचा श्वास घेतला. भारती यांच्या पश्चात पती महेंद्र लाड, भाऊ विश्वजीत कदम, बहीण अस्मिता जगताप असा परिवार आहे. त्यांचे पती महेंद्र लाड हे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.
भारती विद्यापिठाचे नामकरण
पतंगराव कदम यांनी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली होती. लाडकी कन्या ‘भारती’ यांच्या नावावरुन पतंगरावांनी या विद्यापिठाचं नामकरण केलं होतं. भारती लाड या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांच्या पत्नी होत.