जेव्हढ तुमच्या देशाचं बजेट तेवढं भारताच्या लष्कराचं.. असदुद्दीन ओवैसींचा पाकिस्तानवर थेट वार

Asaduddin Owaisi On Pakistan : काश्मीरातल्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. (Pakistan) त्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानचा आर्थिक कणा मोडून त्यांना धडा शिकवावा असंही ओवैसी म्हणाले आहेत. ते परभणी येथे सभेत बोलत होते.
काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?
पाकिस्तान भारतापेक्षा अर्धा तास नाही तर अर्धं युग मागे आहे. पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नयेत. तुमच्या देशाचं जे बजेट आहे तेवढं आमच्या भारताच्या लष्कराचं बजेट आहे हे विसरु नका. पाकिस्तानकडून वारंवार सांगितलं जातं की त्यांच्याकडे अणु बॉम्ब आहे. तुम्ही लक्षात ठेवा की दुसऱ्या देशात जाऊन निर्दोषांची हत्या कराल तर कुठलाच देश गप्प बसणार नाही असंही ओवैसी म्हणाले आहेत.
काश्मीर आमचे आहे, आम्ही मोठ्या संख्येने येणार अभिनेता अतुल कुलकर्णी पोहोचला पहलगाममध्ये
धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, तुम्ही कुठल्या धर्माच्या गोष्टी करत आहात? तुमच्या कृती नरकाहून वाईट आहेत. ISIS चा वारसा पुढे चालवत आहात त्यामुळे आम्हाला शिकवू नका. पाकिस्तान आजच नाही गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या कुरापती काढतो आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचा आर्थिक कणा मोडून त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे असंही ते यावेळी म्हणालेत.
काश्मीर हा भारताचा भाग
काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. काही टीव्ही चॅनल्सचे अँकर्स हे काश्मिरी नागरिकांच्या विरोधात बोलत आहेत. त्यांना थोडी लाज वाटली पाहिजे. काश्मीर आपलं आहे आणि आपलंच राहिल. भारताचं अभिन्न अंग म्हणजे काश्मीर. आपण काश्मिरी लोकांवर संशय कसा घेऊ शकतो? एक काश्मिरी माणूस होता ज्याने दहशतवाद्यांशी लढताना प्राण गमावले अशा लोकांवर आपण संशय घेता कामा नये असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.