Bhiwandi News : भेसळयुक्त खाद्यपदार्थ तयार करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार आता सर्रास घडू लागले आहेत. आता तर कत्तलखान्यात कापलेल्या म्हशी आणि रेड्याच्या चरबीपासून तूप (Ghee) बनविण्यात येत असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भिवंडीत (Bhiwandi News) एका ठिकाणी बंद पडलेल्या कत्तलखान्यात हा कारखाना सुरू होता. छापा टाकून हा कारखाना उद्धवस्त करण्यात आला. या प्रकरणी भिवंडी महापालिका प्रशासनाकडून भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या तुपाचा विविध खानावळी आणि हॉटेल्सना पुरवठा केला जात होता.
Road Accident : भीषण अपघात! उड्डाणपुलावरून खाली पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
या परिसरात कारखाना सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्या होत्या. त्यानंतर मनपा आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. पर्यावरण विभागाचे अधिकारी, सहाय्यक आयुक्तांनी कारवाई करत कारखान्यावर छापा टाकला. यावेळी पथकाला येथे चरबीपासून तयार करण्यात आलेल्या तुपाचे डबे, तूप बनविण्याचे साहित्य मिळून आले. हे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या धंद्यातील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
दरम्यान, सध्या खाद्यपदार्थात भेसळीच्या घटना वाढल्या आहेत. तूप आणि गुळात भेसळीचे प्रमाण जास्त आहे. काही वेळेस दुधातही भेसळ होते. या खाद्य पदार्थात काय मिसळले जातेा याची काहीच माहिती लोकांना नसते. मात्र, या अशा घातक खाद्यपदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तूप, भेसळयुक्त गुळ आणि साखरेवर अन्न औषध विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.
Pune News : पुण्यात दरोडा! 5 किलो सोनं, 10 लाख रुपयांवर चोरट्यांचा डल्ला; गुन्हा दाखल