BJP On Supriya Sule : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना सामाजित कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या कवितेतून एक्सच्या माध्यमातून टीका केली होती. त्यावर भाजपने देखील सुळे यांना कविता पोस्ट करत कवितेला कवितेतून उत्तर दिलं आहे.
पुणे-मिरज रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे किती काम झाले? पूर्ण कधी होणार? मध्य रेल्वेने दिली सविस्तर अपडेट
काय आहे भाजपची कविता?
दहा कोटींची वांगी
उगवते माझ्या शेतात
कोणती ही मशागत?
चर्चा जनमाणसात
बारा बॉम्बस्फोटांनी मुंबईकर हादरला
‘ते’रावा स्फोट माझ्या पप्पांनी घडवला
अतिरेक्यांच्या मैफिलीत अवघा ‘शरद’ बहरला
दहा कोटींची वांगी
उगवते माझ्या शेतात
कोणती ही मशागत?
चर्चा जनमाणसातबारा बॉम्बस्फोटांनी मुंबईकर हादरला
'ते'रावा स्फोट माझ्या पप्पांनी घडवला
अतिरेक्यांच्या मैफिलीत अवघा 'शरद' बहरलाआम्हा, बाप – लेकीला,
आस एक लावसाची
जमीन लाटून कष्टकऱ्यांची
माडी उभारू 'शरदचंद्रा'चीराजकीय… https://t.co/MsQho2kHgc
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 27, 2023
आम्हा, बाप – लेकीला,
आस एक लावसाची
जमीन लाटून कष्टकऱ्यांची
माडी उभारू ‘शरदचंद्रा’ची
राजकीय कारकिर्द 53 वर्षाची
हौस भारी बिरुदे मिरवण्याची
काय सांगू माझ्या पप्पांची महती,
जिथे तिथे फक्त खंजीरच खुपसती..
ही कविता सुप्रिया सुळेंच्या टीकात्मक कवितेला उत्तर म्हणून भाजपच्या अधिकृत एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये भाजपने सुप्रिया सुळेंच्या पोस्टला देखील मेंशन केले आहे. त्यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. लवासा, स्फोटाच्या मुद्द्यावरून त्यांनी पवार आणि सुळेंवर टीका केली.
काय आहे प्रकरणं?
आगामी वर्षभरात पत्रकारांनी आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, ढाब्यावर न्या, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिला होता. त्यांच्या या विधानानंतर विविध स्तरातून नाराजी व्यक्त केली गेली.
Anupriya Patel : लग्नाच्या वाढदिवसाला निघाले, केंद्रीय मंत्र्यांच्या पतीचा अपघात
त्यावर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Herabha Kulkarni) यांनी एक कविता सादर केली आहे. विविध प्रकरणांवर भाष्य करणाऱ्या या कवितेच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. कुलकर्णी यांची ही कविता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे.
काय होती सुप्रिया सुळेंनी शेअर केलेली हेरंब कुलकर्णींची कविता?
चला, आपण धाब्यावर जाऊ…
( हेरंब कुलकर्णी)
मी त्यांना म्हणालो
पाण्यात तरंगणारे तुमचे
नागपूर शहर आपण पाहू
ते म्हणाले
नको नको,
त्यापेक्षा आपण,
धाब्यावरच जाऊ…..!!!
धाब्यावर जाताच, मी म्हणालो-
दारू दुकाने वाढवण्याची,
निषेधार्ह बातमी दाखवू का ?
ते म्हणाले ” हवी ती चव
आत्ता तुम्हाला चाखवू का ?”
चला, आपण धाब्यावर जाऊ…
( हेरंब कुलकर्णी)मी त्यांना म्हणालो
पाण्यात तरंगणारे तुमचे
नागपूर शहर आपण पाहूते म्हणाले
नको नको,
त्यापेक्षा आपण,
धाब्यावरच जाऊ…..!!!धाब्यावर जाताच, मी म्हणालो-
दारू दुकाने वाढवण्याची,
निषेधार्ह बातमी दाखवू का ?
ते म्हणाले " हवी ती चव…— Supriya Sule (@supriya_sule) September 27, 2023
मी विचारले सहजपणे ,
समृध्दी महामार्गावर,
अपघात का बरे वाढले ?
प्रश्न दाबायला त्यांनी मग
पाकीटच बाहेर काढले …..
न्यायमूर्ती लोया नागपुरात,
नेमके कशाने वारले ?
उत्तर म्हणून त्यांनी,
समोर मेन्यू कार्ड धरले …
शेतकरी आत्महत्या भागात,
दौऱ्यावर कधी जाऊ या ?
ते म्हणाले सांगा ,
जेवणाची ऑर्डर काय देऊ या ?
मी विचारले कंटाळून,
अच्छे दिन आता
सांगा ना कधी येणार ?
ते म्हणाले सांगा आधी,
तुम्ही गिफ्ट काय घेणार ?
कंटाळून विचारले शेवटी मी –
९ वर्षापासून लावलेल्या स्वप्नांची
रोपटी आता कधी वाढायची ?
त्यांनी विचारले, पत्रकारांची
ताडोबात ट्रीप कधी काढायची ?
आजूबाजूला सगळे मद्यपी बघत
आम्ही धाब्यावरून निघत होतो..
सत्तेची नशा करते, किती बेधुंद
हे त्यांच्या डोळ्यात बघत होतो..
– हेरंब कुलकर्णी