Phaltan Doctor Death Case : महिला डॉक्टरची आत्महत्या ते शवविच्छेदन; आमदार सुरेश धसांना वेगळाच संशय…

महिला डॉक्टर संपदा मुंडे निर्भीड होती, यंत्रणेशी लढत होती, ती कशी आत्महत्या करेल असा संशय भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे.

Suresh Dhas Phaltan

Suresh Dhas Phaltan

Phaltan Doctor Death Case : साताऱ्यातील डॉक्टर संपदा मुंडे (Phaltan Doctor Death Case) यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्यांचे सुरुवातीपासूनचे फोटो कुटुंबियांना दाखवलेले नाहीत, थेट शवविच्छेदनगृहात नेले, संपदा मुंडे निर्भीड होती, यंत्रणेशी लढत होती, ती कशी आत्महत्या करेल असा संशय भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे. आमदार धस यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

आपण कधीतरी थांबायचं का? असा प्रश्न माझ्या मनात.., मंत्री संजय शिरसाटांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत

पुढे बोलताना आमदार धस म्हणाले, संपदा मुंडेंच्या बाबतीत दुर्देवी आणि क्रुर घडलंय. तिची आत्महत्या एका दिवसात झालेली नाही. तिला हा जाच फेब्रुवारी मार्चपासून सुरु होता, या प्रकरणामध्ये बरेच पाटील, जायपत्रे असे इतरांचीही नावे आहेत. महाडिक म्हणून जे डीवायएसपी आहेत , त्यांनी वेळीच तक्रारीची दखल घेतली असते तर हा दिवस पाहायची पाळी आली नसती. हॉटेलच्या खोलीत तिने सुसाईड केलं तर ती हॅंगिग असताना तिचे व्हिडिओ फोटो काढलेले अद्यापही ते दाखवलेले नाहीत. कुटुंबियांना कळवल्यानंतर हॅंगिग असलेली मुलगी कोणत्या अधिकाराखाली खाली उतरवली आम्हाला थेट पीएम रुममध्ये दाखवलं जात आहे. जर ती एवढी निर्भीड होती यंत्रणेशी लढत होती, तर मग अशी मुलगी सुसाईड करेल का? असा थेट सवाल धस यांनी केलायं.

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मित्राच्या फार्म हाऊसहून दुसरा आरोपी बनकर अटकेत

तसेच रुग्णालयात अनफिट असताना फिट सर्टिफिकेट द्या, असा दबाव संपदा मुंडेंवर टाकण्यात आला. या प्रकरणात माझं काही बरं वाईट झालं तर पोलिसच जबाबदार असतील असं स्टेटमेंट त्यांनी चौकशीत दिलेलं आहे. रुग्णालयात जाऊन धमकी देणे असं कृत्य बदने, आणि बनकर करत होता. तिथल्या पीआय आणि एसपी डीवायएसपींकडे मुंडेंनी तक्रार केली होती. उद्या मुख्यमंत्र्‍यांकडे जाऊन एसआयटी स्थापन करण्याची मागणी करणार असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलंय.

Amit Shah यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बनला ६१० किलोचा विश्वविक्रमी मोतीचूर लाडू!

धुमाळ किती निर्विकारपणे बोलतात जसं काही मी त्या गावाचा नाही. तुम्ही मेडिकल ऑफिसर आहात तुमच्या अधिपत्याखाली संपदा डॉक्टर आहे. मुंडे कुटुंबियांपैकी चुलत भाऊ डॉक्टर आहे शिक्षक आहे इकडे असती तर ती चौथीच्या पुढेही गेली नसते या शब्दांत सुरेश धस यांनी संताप व्यक्त केला आहे.

Exit mobile version