BJP MLA Suresh Dhas Reaction On Manjili Karad : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh Murder) काल न्यायालयाने वाल्मिक कराडला (Walmik Karad) सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तसेच वाल्मिक कराडवर मकोका देखील दाखल करण्यात आलाय. त्यामुळे कराडचे समर्थक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. परळीत बंद पुकारला गेला. संपूर्ण शहरात कराडच्या समर्थकांनी याचा निषेध व्यक्त केलाय. तसेच वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडने देखील परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला होता.
मंजली कराड यांनी पत्रकार परिषद घेवून आमदार सुरेश धस यांना खुलं चॅलेंज दिलं होतं. माझ्या पतीचं प्रकरण उकरून काढणाऱ्यांची देखील प्रकरण उकरून काढू, असा इशारा वाल्मिक कराडच्या पत्नीने पत्रकार परिषदेत दिला होता. त्यावर आता आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांची प्रतिक्रिया समोर आलीय.
याप्रकरणी वाल्मिक कराड म्हणाले ती, ती माझी बहिण आहे. मी त्या भगिणीने केलेल्या आरोपांवर काही बोलणार नाही. कोणत्याही पुरूषाने माझ्यावर आरोप करावेत. मी लई धुतल्या तांदुळासारखं आयुष्य जगलो (Manjili Karad Statement) आहे. माझे काही व्हिडिओ सापडणार नाही. मी त्या माऊलीबद्दल काही बोललो का? असा देखील सवाल त्यांनी केलाय. एखाद्या पुरूषाने माझ्यावर आरोप केले तर त्याला उत्तर देईन, असं देखील आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना सुरेश धस म्हणाले की, आका सोपा नाही. आकाकडे 17 मोबाईल होते. कदाचित तो अमेरिकेचे सीम वापरत असेल. आकाचा बाका 50-50 लोकांना दर महिन्याला काहीतरी ठराविक लोकांना रक्कम पाठवत होता, असा खळबळजनक दावा देखील सुरेश धस यांनी केलाय. सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या समर्थकांवर निशाणा साधलाय. ते समाजाचे कार्यकर्ते नाहीत, तर सोशल मीडियावर रिल्समध्ये असणारी ही पोरं आहेत, अशी टीका सुरेश धस यांनी केलीय. खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुखांची हत्या झाली, असं एसआयटी सांगत आहे. आज रिमांड रिपोर्टमध्ये हेच म्हटलं असल्याचं देखील धस यांनी स्पष्ट केलंय.