रायगड : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेजवार ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीतील पहिला निकाल हाती आला आहे. या दोघांनीही तगडा प्रचार केला होता. या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली होती.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजार 800 मते मिळाली आहे. त्यांनी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण केला आहे. त्यामुळे आपला विजय झाल्याची घोषणा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे. तर दुसरीकडे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना 9 हजार 500 मते मिळाली आहेत. त्यामुळे शेकाप बराबरच महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. म्हात्रे हे शिवसेनेत होते. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी उमेदवारी मिळाली.
शेकापला धक्का, जागा हिसकावले
गेल्या निवडणुकीत बाळाराम पाटील हे विजयी झाले होते. २०१७ मध्ये पाटील यांना ११ हजार ८३७ मते मिळाली होती. त्यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना ६ हजार ६६८७ मते मिळाली होती. आता मात्र म्हात्रे हे शिवसेनेतून भाजपमध्ये गेले होते. आता म्हात्रे यांनी पराभवाचे उट्टे काढले आहेत. शेकापला मोठा धक्का आहे. त्या कोकणात शेकापची ताकद कमी होत असल्याचे या वरून दिसून येत आहे.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान झालं. आज त्याचा निकाल आज लागणार आहे. विधानपरिषदेच्या या पाच जागामध्ये तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. पाचही ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणी (Legislative Council Counting) सुरू झाली आहे.
या निवडणुकीमध्ये निवडणुकीसाठी 5 जागांसाठी 83 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या 83 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. त्यापैकी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीतील पहिला निकाल हाती आला आहे. त्यामध्ये सत्ताधारी भाजपने बाजी मारली आहे.