Download App

पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, जीप थेट विहिरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू

पंढरपूरहूनविठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर गावी परतणाऱ्या भाविकांची काळी-पिवळी जीप विहिरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला

  • Written By: Last Updated:

Jalna Accident : जालन्यातील (Jalna News) राजूर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पंढरपूरहून सावळ्या विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर गावी परतणाऱ्या भाविकांची काळी-पिवळ जीप विहिरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांचे मृतदेह गावकऱ्यांनी बाहेर काढले. राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली.

Sri Lanka vs India : सूर्यकुमार यादव टी-20 संघाचा कर्णधार; शुभमन गिलला उपकर्णधाराची लॉटरी श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी संघ घोषित 

सविस्तर वृत्त असे की, आषाढी एकादशीनिमित्त जालना जिल्ह्यातील काही भाविक पंढरपूरला वारीसाठी गेले होते. विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर ते आज (१८ जुलै) आपल्या गावी जाण्यासाठी जालना बसस्थानकावर आले होते. त्यानंतर बसस्थानकारून काळ्या-पिवळ्या जीपमध्ये बसून मूळ गावी चनेगावकडे निघाले होते. ही भाविकांनी भरलेली जीप राजूरकडे जात असताना खडेश्वर बाबा मंदिर ते वसंत नगर (राजूर जवळ) येथे जीप आणि दुचारीचा गंभीर अपघात झाला. या अपघातात जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली. या आकस्मिक अपघातात 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत सहा भाविकांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात येत आहेत. अन्य काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

IAS खेडकर कुटुंबियांच्या मदतीसाठी अख्खं गाव सरसावलं; मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जालन्यातील चंदनझिरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जीपमध्ये नेमके किती लोक होते याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे प्रशासनाने म्हटले आहे.

follow us