IAS खेडकर कुटुंबियांच्या मदतीसाठी अख्खं गाव सरसावलं; मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार
IAS Pooja Khedkar : राज्यासह देशात गाजत असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यापाठोपाठ त्यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आता खेडकर कुटुंबासाठी पाथर्डी तालुक्यातील ग्रामस्थ सरसावले आहे. खेडकर कुटुंबीयांबाबत कटकारस्थान रचले जात आहे. मात्र या सर्व घटनेची सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील भालगाव ग्रामस्थांनी केलीयं. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. तसेच या प्रकरणी कार्यवाहीमध्ये पारदर्शकपणा असावा अन्यथा येणाऱ्या काळात भालगाव ते मुंबईपर्यंत आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
प्रसाद लाड बांडगूळ, एवढंच प्रेम असेल तर फडणवीसांशी लग्न कर; जरांगेंची जीभ घसरली..
पुणे येथील प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर हे नाव सध्या चर्चेत आलं आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना आज महाडमधून पोलिसांनी अटक केली आहे. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्या फरार होते. त्यांना अटक झाली आहे. मात्र, मनोरमा खेडकर यांच्या मदतीसाठी आता त्यांचे मुळगाव पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील ग्रामस्थ सरसावले आहेत.
बदनामी थांबवा अन्यथा…प्रशासनाला दिला इशारा
खेडकर कुटुंबियांवर सध्या राज्यभरातून टीकेची झोड उडालीयं. नुकतेच प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाईही सुरू झाली आहे. मात्र, एकीकडे असे असले तरी खेडकर यांचे मूळ गाव भालगाव (ता. पाथर्डी) खेडकर कुटुंबीयांच्या मागे ठामपणे उभे आहे. मनोरमा खेडकर या गावच्या माजी सरपंच होत्या. त्यांच्या काळात गावात विकासकामे झाली. त्यांची सध्या नाहक बदनामी केली जात असून ती थांबविण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामसभेत देण्यात आला. गावात ग्रामसभा घेऊन हा निर्णय जाहीर करण्यात आलायं. नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला यासंबंधी निवेदन देण्यात आले आहे.
Government Schemes : महिला उद्योगिनी योजना आहे तरी काय? महिलांना मिळतंय बिनव्याजी कर्ज…
खेडकर कुटुंबियांविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यांच्या व्हायरल होणार व्हिडिओची केवळ एकच बाजू दाखवण्यात आली. मात्र त्यांनी त्यांच्या स्वसंरक्षणासाठी पिस्तूल हातात घेतले होते. मात्र खेडकर कुटुंबीय दहशत माजवत असल्याचे चुकीचे चित्र व्हिडिओद्वारे दाखवण्यात आले आहे. तरी घटनेची पारदर्शक चौकशी होण्यासाठी भालगाव ग्रामस्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, खेडकर कुटुंबाची पारदर्शक चौकशी व्हावी अन्यथा येणाऱ्या काळात भालगाव ग्रामस्थ हे गावापासून ते मुंबईपर्यंत आंदोलन करतील, असा इशारा भालगाव ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र ग्रामस्थांनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना दिले आहे.