Download App

Abortion : 26 आठवड्यांचा गर्भपातास परवानगी, मुंबई उच्च न्यायालायाचा महत्त्वाचा निर्णय

Bombay High Court Gives Permission to Abort 26 weeks fetus : मुंबई उच्चन्यायालयाने 26 आठवड्यांच्या भ्रुणाच्या गर्भपाताला परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. एका प्रकरणावर सुनावणी देताना एका महिलेला ही मुंबई उच्च न्यायालयान ही परवानगी दिली आहे.

अखेर निळवंडे कालव्याचे स्वप्न साकार, कालव्याच्या उद्घाटनाचे पाहा फोटो

ही महिला विवाहित आहे. या महिलेने न्यायालयाकडे गर्भपाताची परवानगी मागितली होती.तिने माहिती दिली होती की, हे भ्रुण आजाराने ग्रस्त आहे. त्याला मायक्रोसेफली या आजाराची लक्षणं होती. या आजाराने भ्रुणाच्या डोक्याचा पूर्णपणे विकास होत नाही. भ्रुणाचं डोक सामान्या गर्भापेक्षा लहान असतं. त्यामुळे ही परवानगी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी आक्रमक होताच शिंदे एक पाऊल पुढे; सावित्रीबाईंच्या अपमानावरुन दिले कारवाईचे आदेश

दरम्यान भारतात 24 आठवड्यांपर्यंतच्या भ्रुणाच्या गर्भपातास परवानगी आहे. मात्र त्यानंतर गर्भपात करता येत नाही. केल्यास तो गुन्हा ठरतो. या महिलेने 24 महिन्यांनंतर गर्भपातास परवानगी मागितली होती. मात्र या महिलेने अपवादात्मक परिस्थितीत गर्भपातास परवानगी मागितली होती.

खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 पदांची मेगा भरती, 69 हजार रुपये मिळणार पगार

त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत 26 आठवड्यांच्या भ्रुणाच्या गर्भपाताला परवानगी दिली आहे. दरम्यान, न्यायमूर्ती रमेश धानुका आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

Huma Qureshi ने बिकिनीमध्ये दाखवले तिचे सेक्सी कर्व्ह, व्हिडीओ पाहून व्हाल घायाळ

मुंबई उच्च न्यायालायाने या प्रकरणात जे जे रूग्णालयातील वैद्यकीय मंडळाची नियुक्ती केली होती. तर तपासानंतर 26 मे ला या महिलेला 26 आठवड्यांच्या भ्रुणाच्या गर्भपाताला परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा हवाला दिला. एका निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, प्रत्येक गर्भवती महिलेला जन्म देण्याच्या बाबतीत गर्भपात निवडण्याचा अधिकार आहे.

Tags

follow us