अखेर निळवंडे कालव्याचे स्वप्न साकार, कालव्याच्या उद्घाटनाचे पाहा फोटो

अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे.

भूमिपूजनानंतर तब्बल 31 वर्षांनी आज अहमदनगर, अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, खा डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मधुकर पिचड आदी मान्यवर उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे.

नाशिक ते अहमदनगर या दोन जिल्ह्यामधील 125 गावांना पाणी उपलब्ध होणार आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कालव्यांची पाहणी देखील केली.
