Budget Session : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कर्नाटकची दंडेलशाही वाढली आहे. सीमाभागातील (Maharashtra Karnataka Border Dispute) मराठी माणसांवरील अन्यायात वाढ झाली आहे. या प्रश्वावर आज विधानपरिषदेत (Budget Session) आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी सरकारचे लक्ष वेधले.
त्या म्हणाल्या, सीमावर्ती भागातील मराठी भाषिक लोकांना मराठी बोलण्यास बंदी घातली जात आहे. या भागातील मराठी नावे असलेल्या पाट्या काढून टाकल्या जात आहेत. त्यांना जाब विचारणार का, असा प्रश्न आ. कायंदे यांनी केला.
वाचा : Basavaraj Bommai : बोम्मईंच्या विधानानं कर्नाटक-महाराष्ट्र वाद पुन्हा पेटणार
आमदार विक्रम काळे यांनी सुद्धा सरकार काय करत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खडसावणार की नाही, यासंदर्भात सभागृहात निवेदन केले पाहिजे अशी मागणी केली. यानंतर गोंधळ वाढत असल्याचे पाहून सरकारच्या बाजूने उत्तर देण्यासाठी आमदार प्रविण दरेकर उभे राहिले.
सीमाभागातल्या मराठी माणसांसाठी काँग्रेस सरकारने काय दिवे लावले ?, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी तर मराठी माणसांसाठी तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे या प्रश्नावर सरकार कायमच संवेदनशील आहे, असे दरेकर यांनी सांगितले. तरीदेखील गोंधळ कमी होण्याऐवजी वाढला.
तुम्हीच कानडी बोला, मी हिंदी बोलणार नाही; कर्नाटकात रिक्षाचालकाची दादागिरी
दरम्यान, आज विधानसभेतही जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. संजय राऊतांनी आरोप केल्यानंतर मंत्री दादा भुसे आज विधानसभेच चांगलेच तापल्याचं पाहायला मिळाले. दादा भुसेंनी थेट शरद पवारांची चाकरी करत असल्याचं संजय राऊतांना म्हंटलं. त्यावर विधानसभेत अजित पवार दादा भुसेंवर चांगलेच संतापले.
अजित पवार म्हणाले, सभागृहात प्रत्येकाला आपली भूमिका मांडाण्याचा अधिकार आहे. तसंच दादा भुसेंनीही त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर आपली काय भूमिका मांडायचीय ते मांडा पण यामध्ये आमचे राष्ट्रीय नेते शरद पवारांचं नाव घेण्याचं काहीच काम नसल्याचं अजित पवार दादा भुसेंना उद्देशून म्हणाले.