Basavaraj Bommai : बोम्मईंच्या विधानानं कर्नाटक-महाराष्ट्र वाद पुन्हा पेटणार

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 16T120959.549

Maharashtra-Karnatak Border :  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Basavaraj Bommai  ) यांनी पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. सीमाभागातील महाराष्ट्र सरकारच्या योजना रोखणार असल्याचे ते म्हणाले आहेत. यावेळी ते बेळगाव येथून बोलत होते. त्यांनी केलेल्या या विधानाने महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

कर्नाटकातील  सीमावर्ती भागातील 865 गावात चालणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या योजना आम्ही रोखणार आहोत. त्यासाठी आवश्यक ते सर्व करणार असल्याचे बोम्मईंनी म्हटले आहे. आम्ही या योजनेचा अभ्यास करु व या योजना रोखण्यासाठी सर्व  प्रयत्न करु असे बोम्मई म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमावर्ती भागातील लोकांसाठी 54 कोटी रुपयांची महात्मा फुले जनआरोग्य योजना मंजूर केली आहे. यावर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ही योजना रोखण्यासाठी सर्व पर्यत्न करु, असे ते म्हणाले आहेत.

Shahaji Bapu Patil : बजेटवर काय बोलायचं हा प्रश्न अजित पवारांसमोर होता; शहाजी पाटील यांचा निशाणा

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यानंतर राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मराठी माणसे राहतात. त्यांनी तेथील सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. याउलट त्यांच्यावर मराठीची सक्ती केली जाते. त्या लोकांचे आजही म्हणणे आहे की आम्ही महाराष्ट्रात आहोत. मागच्या सरकारने त्यांना कोणत्याही योजना दिल्या नाहीत. पण शिंदे-फडणवीस सरकारने त्यांना जनआरोग्य व इतर योजना दिल्या आहेत. बोम्मईंची ही भुमिका योग्य नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत या योजना त्यांना देणारचं, असे शंभूराजे देसाईंनी म्हटले आहे.

Delhi Capitals New Captain : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे दिल्ली कॅपिटल्सची धुरा

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी देखील असाच बसवराज बोम्मई यांच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला होता. तेव्हा अनेकांनी दोन्ही राज्यातील बसला काळे फासले होते. त्यामुळे या दोन्ही राज्यातील बस सेवा काही काळ बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस व कर्नाटकचे मुख्यंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली होती. त्यानंतर जोपर्यंत हे प्रकरण न्यायालयात आहे तोपर्यंत यावर भाष्य करु नये, असे अमित शाह म्हणाले होते. पण आता बोम्मईंच्या विधानानंतर हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Tags

follow us