Mumbai University : आता AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने कॅन्सर (Cansar) आणि टीबीसारख्या आजारांमधून रुग्णांची सुटका होणार आहे. मुंबई विद्यापीठ (Mumbai University) आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI च्या मदतीने एक खास मॉडेल तयार करत असून या मॉडेलच्या मदतीने आरोग्याशी संबंधित एक डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म करण्यात येत आहे. कॅन्सरग्रस्त आणि टीबीग्रस्तांसाठी हे प्लॅटफॉर्म वरठान ठरणार असल्याचा दावा केला जात आहे.
अहमदनगरमध्ये एक हजार मुलींसाठी मोफत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण
आरोग्य क्षेत्रात AI च्या मदतीने मोठी क्रांती घडवून आणण्यासाठी मुंबई विद्यापीठाने मोठं पाऊल उचललं आहे. कॅन्सरसारख्या आजारांवर मात करण्यासाठी मुंबई विद्यापीठ राज्यातील सर्व रुग्णालयातून आकडेवारी घेत असून माहिती संकलित केली जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वैद्यकीय शुल्क अर्ध्याहून अधिक कमी केले जाऊ शकते. एआय मॉडेल्सबाबत मुंबई विद्यापीठात एक समितीही स्थापन करण्यात आलीयं. आम्ही शक्य तितका डेटा मिळविण्याचा प्रयत्न करत असून मॉडेल चांगल्या प्रकारे तयार करत असल्याचं मुंबई विद्यापीठाच्या संशोधन आणि विकास विभागाचे संचालक डॉ. फारूक काझी यांनी सांगितलंय.
Ground Zero : वैजापूरमध्ये रमेश बोरणारे सुसाट… ठाकरे अद्यापही उमेदवाराच्याच शोधात
आजार शोधण्यापासून ते उपचारापर्यंंतची सर्व प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मॉडेल बनवण्यात येत आहे. सर्वप्रथम स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाच्या संबंधित आजारांसाठी हे मॉडेल वापरण्यात येणार आहे. ज्या ग्रामीण भागात डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्ससारख्या सुविध कमी प्रमाणात आहेत, अशा भागांत पोहोचण्याचा मानस आहे. या मोहिमेला ‘आरोग्य महिला सक्षम भारत’ असे नाव देण्यात आलं असल्याचं मुंबई विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आर. श्रीवरमांगाई यांनी सांगितलंय.
शरद पवार मनोज जरांगेंच्या पाठीशी हे आता क्लिअर झालंय : प्रकाश आंबेडकर
दरम्यान, अऩेक रुग्ण आपलं संपूर्ण जीवन डॉक्टरांकडे जाण्यातच घालवत असतात, महागड्या चाचण्या करून घेतात, नंतर उपचारांसाठी मोठी बिले भरतात. खर्चाच्या भीतीने अनेक रुग्ण या आजारावर उपचार करत असतात. मात्र, मुंबई विद्यापीठाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल मिशन यशस्वी झाल्यास आरोग्य यंत्रणेसाठी ते मोठे वरदान ठरणार आहे.