10th Exam Date CBSE High School : दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (CBSE Board Date Sheet 2025) एक मोठी बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी CBSE बोर्ड परीक्षा 2025 साठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलंय. विशेष म्हणजे बोर्डाने परीक्षेच्या अंदाजे 86 दिवस आधी डेट शीट (10th Exam Date CBSE) जारी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही लक्षणीय सुधारणा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
गौतम अदानींच्या अडचणीत वाढ; यूएसमध्ये लाचखोरी आणि फसवणूकीचे आरोप, अटक वॉरंट जारी
सीबीएसई बोर्ड साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये परीक्षेच्या तारखा जाहीर (10th Exam) करते. मात्र, यावर्षी अचानक डेट शीट जाहीर करून सर्वांनाच चकित केलंय. यामुळे विद्यार्थ्यांना एक महिनाअगोदरच परीक्षेचे वेळापत्रक समजलेले आहे. याचा विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे? ‘या’ हाय व्होल्टेज लढती ठरणार महत्वाच्या, वाचा सविस्तर
वेळापत्रकानुसार, CBSE माध्यमिक शाळा परीक्षा 2025 इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 18 मार्च 2025 पर्यंत चालेल. डेटशीटनुसार, इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होतील. यावेळी परीक्षेच्या 86 दिवस आधी डेटशीट जारी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळाला आहे. डेट शीट प्रसिद्ध करताना विद्यार्थ्याच्या दोन विषयांच्या परीक्षा एकाच तारखेला होऊ नयेत, याचीही काळजी घेण्यात आल्याचे मंडळाने म्हटले आहे.
CBSE बोर्ड 10वी परीक्षेचे वेळापत्रक :
15 फेब्रुवारी 2025: इंग्रजी संप्रेषण/इंग्रजी भाषा आणि साहित्य
20 फेब्रुवारी 2025: विज्ञान
22 फेब्रुवारी 2025: फ्रेंच/संस्कृत
25 फेब्रुवारी 2025: सामाजिक विज्ञान
28 फेब्रुवारी 2025: हिंदी कोर्स A/कोर्स B)
10 मार्च 2025 : अंकशास्त्र
18 मार्च : माहिती तंत्रज्ञान (IT)
सीबीएसई दहावी आणि बारावीची विषयनिहाय डेटशीट काल जाहीर केली. सीबीएसईच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा 18 मार्च रोजी तर, बारावीची परीक्षा 4 एप्रिल रोजी संपणार आहे. सीबीएसईने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक मागील वर्षीच्या तुलनेत 23 दिवस आधी जाहीर केले आहे.