Download App

Uddhav Thackeray : भुजबळांकडे पेढे तर, पटेलांकडे…; अधिवेशनानंतर ठाकरेंचा प्लॅन ठरला

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray On Chagan Bhujbal & Praful Patel : एकीकडे नागपूर अधिवेशनात राज्यातील अनेक गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अधिवेशनानंतरचा त्यांचा प्लॅन जाहीर करून टाकला आहे. अधिवेशन संपल्यानंतर आपण भुजबळांकडे पेढे तर, प्रफुल्ल पटेल यांच्या मिर्जी कम जेवण करण्यासाठी जाणार असल्याचे ठाकरेंनी जाहीर करून टाकलं  आहे. या दोघांकडे आपण कोणत्या कारणासाठी जेवायला जाणार आहे याची फोडदेखील ठाकरे करण्यास विसरले नाही.

दीड वर्षांनंतर शिंदे सरकारला जाग; मागासवर्ग आयोगातील राजीनामा सत्रात नवा ट्विस्ट

भुजबळांकडे जाऊन खाणारे पेढे

भुजबळांकडे आम्ही पेढे खायला जाणार असल्याचे सांगताना ठाकरे म्हणाले की, छगन भुजबळांची (Chagan Bhujbal) महाराष्ट्र सदन प्रकरणातील चौकशी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता आम्ही आता छगन भुजबळांकडे पेढे खायला जाणार आहोत. महाराष्ट्र सदन भ्रष्ट्राचार प्रकरणात भुजबळ काहीवर्षे तुरूंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. मात्र, त्यानंतरही त्यांना तुम्ही जामीनावर आहात अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात येत होत्या. परंतु, आता याच प्रकरणात अचानक ट्विस्ट आला असून, त्यांची चौकशी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे असं नेमकं काय घडलं की, अचानक भुजबळांची चौकशी बंद करण्यात आली? असा सवाल ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

ललित पाटील प्रकरणावरून ठाकरेंच्या आमदारांनी घेरलं पण, फडणवीस पुरून उरले

पटेलांकडे मिर्ची कम जेवणासाठी जाणार

भुजबळांकडे पेढे खाऊन झाल्यानंतर त्यानंतर मी संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर आपण प्रफुल पटेलांकडे (Praful Patel) जेवायला जाणार असल्याचे सांगितले. पण जेवायला जाण्यापूर्वी त्यांना मिर्ची कम जेवायला द्या अशी विनंती करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

“35 हजार कोटींची गुंतवणूक अडचणीत” : इथेनॉल निर्मितीवर बंदीवरुन अजितदादांचे केंद्राला खरमरीत पत्र

पटेल, भुजबळांना समोर करत भाजपला टोले

ठाकरेंनी सांगितलेल्या त्यांच्या नियोजनानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी, हे नियोजन सांगण्याच्या उद्देशाने ठाकरेंनी भुजबळ आणि पटेलांच्या खांद्यावर बंदूक ठेवत भाजपवर टोलेबाजी केली आहे. कारण, नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवबा मलिक सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे मोठा गदारोळ झाला होता. फडणवीसांनी अजितदादांना खुलं पत्र धाडलं होते. मात्र, हे सर्व होत असताना प्रफुल पटेलांनी इक्बाल मिर्चीशी व्यवहार केले त्याबद्दल भाजपा काहीच का बोलत नाही? हे नोंद घेण्यासारखे आहे. हेच दोन मुद्दे अधोरेखित करत ठाकरेंनी पटेल आणि भुजबळांना समोर करत भाजपला टोले लगावले आहेत.

follow us