Download App

मोठी बातमी! ठाकरेंना ‘डबल केसरी’चा जय महाराष्ट्र, चंद्रहार पाटलांचा शिंदे गटात प्रवेश

चंद्रहार पाटील शिंदे गटात. ते म्हणाले, 'माझा कुठल्याही पक्षाबाबत किंवा नेत्याबाबत काहीही आक्षेप नाही. माझा आक्षेप आहे.

Chandrhar Patil Join to Shinde Group : लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडीत ज्यांच्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात संघर्ष झाला तेच चंद्रहार पाटील यांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रहार पाटील यांच्या हाती शिवसेनेचा झेंडा दिला. (Patil) चंद्रहार पाटील हे उद्धव सेनेला सोडचिठ्ठी देणार हे जवळपास निश्चित मानलं गेलं होतं. दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट लिहूनही चंद्रहार पाटील यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला होता.

काय म्हणाले चंद्रहार पाटील?

‘माझा कुठल्याही पक्षाबाबत किंवा नेत्याबाबत काहीही आक्षेप नाही. माझा आक्षेप आहे तो महाविकास आघाडीबाबत आहे. लोकसभा निवडणूक लढत असताना माझ्या उमेदवारीबाबत सगळ्यांनी काय झालं ते पाहिलं. पण शेतकऱ्याच्या मुलाला हरवण्यासाठी महाविकास आघाडीही माझ्यासमोर शत्रू म्हणून उभी राहिली. महायुतीही शत्रू म्हणून उभी राहिली. मी ती निवडणूक एकटा लढलो, मागे हटलो नाही असं मत चंद्रहार पाटील यांनी पुन्हा एकदा व्यक्त केलं आहे.

आज तुमची वेळ, उद्या माझी येईल; पराभवानंतर चंद्रहार पाटील यांची भावनिक पोस्ट

लोकसभेत ६० हजार मतं मला मिळाली. ही संख्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जास्त मोठी नाही. कारण, चार लाख वगैरे मतं घेऊन निवडून येत असतो. पण आज शेतकऱ्यांचा मुलगा दिग्गजांसमोर उभा होता. मात्र, सांगली जिल्ह्याला घराणेशाहीची कीड लागली आहे. माझ्यासाठी ६० हजार मतं खूप मोठी आहेत. मला ताकद द्या, ६० हजार मतांची ताकद मी सहा लाख मतांमध्ये करु शकतो असा विश्वास आहे असंही ते यावेळी म्हणाले.

follow us