Download App

Chandrakant Handore यांचा बॉम्ब : भाजपशी हातमिळवणी करणाऱ्यांची यादी तयारच आहे

मुंबई : काँग्रेसमधील ज्या नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केली त्या नेत्यांची यादी तयारच असल्याचा बॉम्ब काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांनी टाकला आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षात अती लोकशाही असल्यानेच गटबाजी झाल्याचं रोखठोक मत हंडोरे यांनी व्यक्त केलंय. हंडोरे यांनी लेट्सअशी संवाद साधला आहे. त्यावेळी ते बोलत होते.

हंडोरे (Chandrakant Handore )म्हणाले, काँग्रेसमध्ये असलेले नेते दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांना पक्षाने जाऊ द्यावे, तसेच काँग्रेसमध्ये असलेल्या अती लोकशाहीमुळेच गटबाजी झाल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजीमधून राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण सुरू झाले आहे.

पोटनिवडणुकीवरून वसंत मोरेंनी शिंदे- फडणवीस सरकारला सुनावलं ; ‘तुमचा पराभव निश्चित… 

विधान परिषदेच्या निवडणुकीत बेशिस्तपणा झाला असून त्यावर कारवाई झाली पाहिजे, संस्थानिक स्वतःचा विचार करताय का? याचा देखील पक्षाने विचार करण्याची गरज असल्याचं चंद्रकांत हंडोरेंनी स्पष्ट केलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत माझाही पराभव झाला होता, मला हक्काची 27 मते देण्यात आली मात्र, प्रत्यक्षात मला 22 मते मिळाली होती. त्यावेळी बेशिस्त वर्तन करणाऱ्या आमदारांवर कारवाई झाली नाही. त्यानंतर पक्षात बेशिस्ती वाढत गेली, त्यामुळेच सत्यजित तांबेंचं प्रकरण घडल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Turkey-Syria Earthquake : मृतांचा आकडा १६ हजारापेक्षा जास्त, काय आहे सध्याची परिस्थिती?

नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात काँग्रसचे चांगले नेते आहेत, पण कोण चुकले यावर काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीसमोर खुली चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत हंडोरे यांनी केली आहे. तसेच जे नेते काँग्रेसला सोडून जात आहेत, त्या नुकसानीची भीती आता पक्षाने बाळगू नसल्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिलाय.

काँग्रेसच्या नेत्यांचा अजेंडा काय?
सध्या संस्था वाचवणे आणि सतत सत्तेत राहणे हा काँग्रेसमधील काही नेत्यांचा अजेंडा झाला आहे. म्हणूनच आता हे नेते भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याचं भाकीतही चंद्रकांत हंडोरेंनी केलंय. तसेच काँग्रेस पक्षात विविध मुद्द्यांवर वाद होत असतात, लोकशाहीत वाद झालेच पाहिजे पण लोकशाही अती प्रमाणात वाढली तर पक्षात बेशिस्तपणा येत असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

Kunal Tilak : ब्राह्मण नाराज आहे की नाही 2 तारखेला कळेलच !

पराभवाबद्दल राहुल गांधीसोबत चर्चा करणार :
विधानसभा सदस्यांमधून निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषद सदस्य निवडणुकीत माझा पराभव झाला. निवडणुकीत मला कोणी मत दिलं नाही, माझ्या विरोधात कोणी काम केलं? कोणी भाजपासोबत हातमिळवणी केली. याबाबतचा अहवाल मी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना दिला आहे. मी पाठवलेल्या अहवालावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे कारवाई झाली नसल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. मात्र, आपण भारत जोडो यात्रा संपल्यानंतर मी राहुल गांधी यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांत ज्या घडामोडी काँग्रेसमध्ये घडल्या आहेत त्यानंतर आता पक्षश्रेष्ठींनी विचार करण्याची गरज असून पुढील आठवड्यात होणाऱ्या काँग्रेसची बैठक वादळी ठरणार असल्याची शक्यता चंद्रकांत हांडोरे यांनी वर्तवली आहे.

Tags

follow us