Chandrashekhar Bavankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चांवर ते आपल्या संपर्कात नसल्याचे सांगितलं मात्र यावेळी त्यांनी आमच्या सोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार असल्याचे सुतोवाच देखील केलं. काँग्रेसला मोठा धक्का दिल्यानंतर आता भाजप शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
Draupadi Murmu यांचा बालपण ते राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास! इराणींकडून राष्ट्रपतींची खास मुलाखत
त्यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेंटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक लोक सोबत येण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे कुणालाही नाही म्हणणार नाही. असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले. नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते.
गुरूजनांसाठी राज मैदानात! निवडणुकांच्या रणधुमाळीपूर्वीच ठाकरेंनी घेतला आयोगाशी पंगा
तसेच ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्या गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत. ते कोणाच्या संपर्कात आहे? हे मला माहित नाही. परंतु माझ्या संपर्कात नाहीत. मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी आमच्यासोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार असून पक्षात भरपूर स्पेस आहे. कुणालाही नाही म्हणणार नाही. विजय वडेट्टीवार यांच्याबाबतचही असेच आहे. असेही ते म्हणाले.
कुणीही आमच्या पक्षात आले. तरी कार्यकर्ता व्यथित होत नाही. कारण भाजपाचा कार्यकर्ता राष्ट्रप्रथम या भूमिकेतून काम करतो. भाजपा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाही. अशी प्रतिक्रिया यावेळी बावनकुळे यांनी दिली.