गुरूजनांसाठी राज मैदानात! निवडणुकांच्या रणधुमाळीपूर्वीच ठाकरेंनी घेतला आयोगाशी पंगा

  • Written By: Published:
गुरूजनांसाठी राज मैदानात! निवडणुकांच्या रणधुमाळीपूर्वीच ठाकरेंनी घेतला आयोगाशी पंगा

मुंबई : येत्या काही दिवासात देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) निवडणूक आयोगाशी (Election Commission) वैर घेतले आहे. निवडणूक आयोग 5 वर्ष काय करतं? शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, त्यांच्यावर कोण कारवाई करतं बघतोच असा कडक इशारा देत राज यांनी हे वैर अंगावर ओढावून घेतलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

भाजपसोबत युती करणार का? प्रश्न विचारताच राज म्हणाले माझा विषय वेगळाय….

तुमच्यावर कोण कारवाई करत ते बघतोच… 

आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील शिक्षकांना निवडणुकांची कामे करण्यासाठी आयोगाकडून आदेश देण्यात आले आहे. पुढील तीन महिने हे काम शिक्षकांकडून करून घेतले जाणार आहे. मात्र, तीन महिने निवडणुकांचे काम केल्यास विद्यार्थ्य़ांचे मोठे नुकसान होईल असे शिक्षकांचे मत आहे. त्यावर राज यांनी कोणत्याही शिक्षकाने निवडणुकीच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुमच्यावर कोण काय कारवाई करतं, ते मी पाहतोच असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

उगाच डिमांड नाही…; 500 जणांचा लवजमा असलेल्या भाजपची सुळेंकडून चिरफाड

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जवळपास 4 हजार 136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यात आलं आहे. एवढं काय काम असतं? निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतं? असा सवालही यावेळी राज यांनी उपस्थित केला. दरवर्षी निवडणूक आल्यावर घाई गडबडीत का कामं करुन घेतली जातात? असा प्रश्नही राज यांनी निवडणूक आयोगाला विचाराला आहे.

राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत! आता शरद पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

निवडणूक आयोगाचा आयुक्त पाच वर्षे काय करतो, तुम्हाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का? ही पहिली निवडणूक आहे का, किती लोकं लागणार, ते तुम्हाला माहिती नाही. शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे हे असते. निवडणूक आयोग शिस्तभंगाची कारवाईची भीती दाखवतो. उलट आयोगावरच कारवाई केली पाहिजे, असेही राज यावेळी म्हणाले.

हे फक्त झुलवण्याचं काम

यावेळी राज यांना मराठा आरक्षणासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, या अधिवेशनामुळे काही होणार नाहीये. हा विषय राज्याचा नसून केंद्रातील आणि सर्वोच्च न्यायालयातील आहे. या आरक्षणात तांत्रिक त्रुटी असून, त्या सुटल्याशिवाय हाताला काहीच लागणार नाही. सध्या फक्त या मुद्द्यावरून झुलवलं आणि भुलवलं जात असल्याचेही राज यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज