निवडणूक आयोगाविरुध्दच्या याचिकेवर आज SCमध्ये सुनावणी, पक्ष अन् चिन्ह शरद पवार गटाला मिळणार?

  • Written By: Published:
निवडणूक आयोगाविरुध्दच्या याचिकेवर आज SCमध्ये सुनावणी, पक्ष अन् चिन्ह शरद पवार गटाला मिळणार?

NCP Crises : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालया आज (दि. 19 फेब्रवारी) सुनावणी होणार आहे.

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या हटके अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना 

गेल्या वर्षी अजित पवारांसह सुमारे ४० आमदारांनी राष्ट्रवादीतून बंडाळी करून भाजपशी हातमिळवणी केली. यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगात खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असल्याचा दावा केला. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या संघर्षावर सुनावणी करताना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे नाव आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे शरद पवार यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

शरद पवार यांनी गेल्या शुक्रवारी सांगितले होते की, राज्यसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून व्हिप जारी केला जाऊ शकतो, त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गेल्या गुरुवारी अजित पवार यांच्या गटाच्या बाजूने दिलेल्या निर्णयामुळे या याचिकेवर तातडीची सुनावणी होण्याची गरजही पवारांनी व्यक्त केली.

अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल
तर दुसरीकडे, निवडणूक आयोगाने आपल्या बाजूने निर्णय दिल्यानंतर शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन अजित पवार यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या कॅव्हेटमध्ये शरद पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घेण्यापूर्वी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे म्हटले आहे.

मोठी उलथापालथ! SC च्या सुनावणीपूर्वीच चंदीगडच्या महापौरांचा राजीनामा, 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश 

दरम्यान, आज न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपाठीसमोर शरद पवार यांच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज काय निर्णय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली हे साऱ्या देशाला माहीत – पवार
मी अनेक वेळा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली आहे. एखाद्याला वाटेल की, चिन्ह काढून घेतले तर अस्तितव काढून घेऊ. मात्र, तसं होत नाही. नवीन चिन्ह आपल्याला मिळेल. हे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. पक्ष आणि चिन्ह सेटलमेंट करून घेण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी केला. भविष्यात आमच्यावर अन्यायकारक निर्णय घेतला जाईल. मात्र, राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली हे साऱ्या देशाला माहीत आहे, असंही पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज