BJP 2024 Election : महाराष्ट्राच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप 150 जागा जिंकणार व महायुती 200 जिंकणार, असा दावा महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच 2024 च्या लोकसभेत महायुती राज्यामध्ये 45 प्लस जागा जिंकणार असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपची आज महाविजय 2024 बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना याची माहिती दिली.
बावनकुळे म्हणाले की, “जागावाटपानंतर ज्या काही जागा आमच्या वाट्याला येतील त्यापैकी 80 टक्के जागा जिंकण्याचा निर्णय आम्ही केला आहे. त्यामुळे आम्ही 152 प्लस म्हटलं आहे. म्हणून 152 प्लस भाजप आणि शिवसेना व अजितदादा यांच्यासह 200 पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकणार.”
दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु पण.., प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान…
ते पुढे म्हणाले की, “भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमची युती पक्की आहे. आमचे जागावाटप ठरलेले आहे. कोणतीही अडचण होणार नाही. कोणत्याही सीटवर अडचण येणार नाही. हे सगळं करुन 152 भाजपा व राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासह आम्ही जिंकू. तशाच पद्धतीचं नियोजन आम्ही केलं आहे.”
तसेच काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाल्याने पुढील काळात त्यांच्या काही आमदारांचा ग्रुप काही वेगळा विचार करेल का अशी भीती नाना पटोलेना वाटत आहे. त्यामुळे नाना पटोले अस्वस्थ झाले आहे, असा टोला त्यांनी पटोलेंना लगावला. तसेच खातेवाटपासंदर्भात कोणतीही अडचण नसून लवकरच ते पूर्ण होईल, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
अजितदादांना अर्थखातं; गोगावले, शिरसाटांचा पत्ता कट : भाजपच्या बड्या नेत्याचे मोठे गौप्यस्फोट
दरम्यान, आता भाजपने स्वतःसाठी 152 हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे, परंतु आता यासंदर्भात नवीन वाद सुरू होऊ शकतो. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत, त्यामुळे एकटा भाजप 152 जागांवर दावा करत असेल, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती जागा मिळतील, हा प्रश्नच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात जागावाटपाची रस्सीखेच आधीच जोर धरू लागली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात जागावाटपावरूनही नवा वाद निर्माण होऊ शकतो. भाजपच्या या दाव्यामुळे शिंदे गट आणि अजितदादा गट यांची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.