Download App

ठाकरे बंधूंची युती होणार…, छगन भुजबळांनी राज ठाकरेंना शुभेच्छा देत, दिली मोठी हिंट

Chhagan Bhujbal On Raj Thackeray And Uddhav Thackeray Allience : राजकीय वर्तुळात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा धरल्या आहेत. यावरून राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या (Raj Thackeray And Uddhav Thackeray Allience) आहेत. यासंदर्भात भास्कर जाधव यांनी देखील मोठं वक्तव्य केलंय. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यांची ताकद वाढेल असं भास्कर जाधव यांनी वक्तव्य केलंय. यासंदर्भात ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) देखील मोठं वक्तव्य केलंय.

दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास…

छगन भुजबळ यांनी म्हटलंय की, दोघेही एकत्र आले तरी भाजपला फरक पडणार (Maharashtra Politics) नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील, असं काय मला वाटत नाही. जर दोन नेते एकत्र आले तर नक्कीच बळ वाढेल, त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नक्कीच ताकद वाढेल. किती प्रमाणात वाढेल, हे काही सांगता येत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Air India Plane Crash : 31 मृतदेहांचे डीएनए नमुने जुळले, विजय रुपानी यांच्या मृतदेहाची ओळख पटली

नाशिकच्या पालकमंत्रीसंदर्भात वृत्तपत्रात अनेक बातम्या येत आहेत. या बातम्या चुकीच्या असून मी नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत कोणताही आग्रह धरलेला नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांचे हेलपाटे वाचणार! थेट शाळेत मिळणार एसटी पास, प्रताप सरनाईकांचा निर्णय

राज ठाकरेंना शुभेच्छा

राज ठाकरे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत भुजबळ यांनी म्हटलंय की, त्यांना सर्वजण शुभेच्छा देतात. आम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण होत, राजकारणातील अपेक्षा देखील पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. शरद पवार गटातील अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याचे गिरीश महाजन म्हणत आहेत.यावर छगन भुजबळ म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे.

 

follow us