Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Off Mountain : छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांसह तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (21 ऑगस्ट) घडली. कुणाल मुरलीधर चांदवडे हा डोंगरावरून उडी घेण्याच्या तयारीत असताना त्याला वाचवण्यासाठी पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास प्रयत्न केले. मात्र अखेर कुणालने उडी घेतली आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे वडील मुरलीधर यांचाही तोल गेला. त्यानंतर मुलगा आणि पती डोंगरावरून खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांनीही उडी घेतली.
पोलिस काय म्हणाले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणालला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी पोलीस आणि स्थानिक नागरिक त्याच्याशी सातत्याने संवाद साधत होते. त्याची आईही समोर बसून त्याला समजावत होती. काही वेळाने कुणालचं मनपरिवर्तन होत असल्याचंही जाणवत होतं.
मात्र याचदरम्यान कुणालचे वडील मुरलीधर अचानक डोंगरावर आले. मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी कुणालला पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांचाही तोल गेला आणि ते डोंगरावरून खाली कोसळले. दोघे खाली पडल्याचं पाहून आई संगीता यांनीही त्यांच्यामागे उडी घेतली. या दुर्घटनेत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
पुण्यात ‘एमएच-12’चा अध्याय संपणार! आता वाहनांना मिळणार ‘एमएच-61’ची नवी ओळख
पोलिसांनी सांगितलं की, कुणालचे वडील घटनास्थळी असल्याची माहिती पोलिसांना सुरुवातीला नव्हती. त्यामुळे त्यांना कुणालला अचानक पकडण्यापासून रोखता आलं नाही. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नातच ही दुर्दैवी दुर्घटना घडली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून संपूर्ण घटनेचा तपास केला जात आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण! आरोपी बंडू फाटक यांची निर्दोष सुटका, कोर्टात काय घडलं?
