Download App

उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न, एका वाक्यातच संपवला विषय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. जळगावात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बोल बच्चन भैरवी

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडेतिकडे गाठीभेटी घेत आहेत, असा टोला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray) यांनी राज ठाकरे- देवेंद्र फडणवीस भेटीवरून लगावला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. जळगावात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, बोलबच्चन भैरवी यांना मी उत्तर देत नाही. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना बोलबच्चन भैरवी म्हणत हे उत्तर दिले आहे. कार्यक्रमास आमदार एकनाथ खडसे येणार का? या प्रश्नावर याबाबत मला माहिती नाही असं ते म्हणाले.

जे महाराष्ट्राच्या मनात तेच मी करणार, मनसेशी युती होणार? उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

जळगाव देवेंद्र फडणवीस यांचा आज दौरा आहे. त्यांचे विविध कार्यक्रम आहेत. यामुळे एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस एका व्यासपीठावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होते का? याकडं लक्ष लागलं आहे. खडसे यांनी भाजप पक्षप्रवेशाचा आपला विषय केव्हाचा संपला आहे, असं वक्तव्य करत या विषयाला पूर्णविराम दिला आहे.

राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर बोलताना ठाकरे म्हणाले जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये.. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठीभेटी घ्यायला लागल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी प्रहार चित्रपटातील एक डायलॉग म्हणत विरोधकांना इशारा दिला. अंगावर येणार असाल तर मी उभा आहे. कम ऑन किल मी. पण, येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या. येताना सरळ याल पण जाताना आडवे व्हाल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

follow us