Download App

अतिक्रमणविरोधी नागरिक एकवटले! दिली थेट कर्जत बंदची हाक

Citizens unite against Encroachment call for Karjat band : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar) कर्जत तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अतिक्रमणाविरोधात (Encroachment) नागरिक एकटवले असून त्यांनी आज कर्जत बंदची हाक (Karjat band) दिली आहे. कापरेवाडी वेसजवळील दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरातील अनधिकृत अतिक्रमण आहे. ते हटविण्यासाठी तसेच भविष्यातील अतिक्रमणापासून मंदिराच्या संपूर्ण जागेचे संरक्षण व्हावे, यासाठी तटबंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी कर्जत बंदची (Traffic Issue) हाक देण्यात आली आहे.

गुजरात दंगल प्रकरणातून बाळासाहेबांनी शाहांना कसं वाचवलं? ‘नरकातला स्वर्ग’मधून कट्टाचिठ्ठा बाहेर

कर्जत येथील प्राचीन हनुमान मंदिर परिसरातील अनधिकृत अतिक्रमणाविरोधात आज शुक्रवारी (दि. 16 ) सकाळी 10 वाजता कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको तसेच कर्जत शहर बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती, अखंड हिंदू समाज कर्जत तालुका यांच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान कर्जतमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

रस्त्यांवरील अतिक्रमणांची व्याप्ती सतत वाढत आहे. ते काढण्यात प्रशासन कोणताही रस घेत नाहीये. परिणामी, वाहतूक कोंडीमुळे शहरवासीयांना अडचणी येत आहेत. अपघात देखील होत आहेत. सकाळी अनेक ठिकाणी, दुपारी अनेक ठिकाणी आणि संध्याकाळी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या लोकांना भेडसावत आहे. अतिक्रमणकर्त्यांनी या रस्त्यांवर बेकायदेशीर कब्जा केल्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते.

‘…तर रवींद्र वायकर यांनी आत्महत्या केली असती’, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

मुख्य रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे लोकांना ये-जा करण्यात अडचणी येत आहेत. तसेच, वाहतूक कोंडींच्या समस्येमुळे नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. त्यामुळे आज ग्रामस्थांनी थेट कर्जत बंदची हाक दिली आहे. बेकायदेशीर बांधकामे पाडण्याची पाडण्याची मागणी होत आहे. यासाठी आज रास्ता रोको देखील करण्यात आलाय. मंदिर परिसरातील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे, असा सूर नागरिकांमधून येत आहे.

 

follow us