सातारा डॉक्टर तरूणीच्या चॅटमधून ‘त्या’ दोन्ही गोष्टी सिद्ध; मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली सविस्तर माहिती

CM Devendra Fadanvis यांनी फलटण डॉ आत्महत्या प्रकरणावर उत्तर देत म्हटलं की, या डॉक्टरला लग्नाचं अमिष दाखवून तिचं शोषण केल्याचं समोर आलं आहे.

CM Devendra Fadanvis

CM Devendra Fadanvis

CM Devendra Fadanvis on Satara Doctor woman Suiside : गेल्या काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर पडले होते. कारण या प्रकरणाचे धागेदोरे साताऱ्याचे माजी खासदारांपर्यंत गेले होते. हा प्रश्न अमित साटम यांच्याकडून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. ते म्हणाले की, क्रिमीनल केसेसमधील मेडिकल रिपोर्ट्स बदलण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला गेला त्यातून ही आत्महत्या झाली का? तसेच या प्रकरणावरील एसआयटी चौकशी कधी होणार? असे दोन ते तीन प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यावर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

त्यावर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देत म्हटलं की, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यानंतर सामाजात संतापाची लाट उसळली होती. तसेच या आत्महत्या प्रकरणात तिने तिच्या हातावर लिहिलेला मजकूरातील हस्ताक्षर संबंधित मृत महिला डॉक्टरचं असल्याचं सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर या प्रकरणातील पोलिस अधिकारी बदनेने शारिरीक शोषण केल्याचा आरोप केला. समोर आलेल्या चॅट्समधून देखील या डॉक्टरला लग्नाचं अमिष दाखवून तिचं शोषण केल्याचं समोर आलं आहे.

IndiGo विरुद्ध मोठी कारवाई, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये उड्डाणांमध्ये 5% कपात

तसेच या प्रकरणात महिला डॉक्टरने दिलेलं पत्र आणि पोलिसांना वरिष्ठांना महिला डॉक्टर आरोपींना अनफिट सर्टिफिकेट देत असल्याचं पत्र या सर्व गोष्टी 5 महिने जुन्या आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये एकीकडे बदनेने केलेली फसवणूक आणि दुसरीकडे त्याचा फायदा घेऊन दुसऱ्या आरोपीने केलेली फसवणूक समोर आलेली आहे. त्यामुळे त्यांची नावं हातावर लिहून या महिलेने हि आत्महत्या केली.

धनंजय मुंडेंनी स्वतः अर्ज देऊन ब्रेन मॅपिंग करावी; देशमुख प्रकरणावरून सुरेश धसांनी मुंडेंना पुन्हा घेरलं

यामध्ये ही आत्महत्या गळफास लावून केली गेलेली आहे. हातावर लिहिलेला मजकूरातील हस्ताक्षर डॉक्टर महिलेचा आहे. हे देखील समोर आलेले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास अद्याप बंद करण्यात आलेला नाही. याची चार्जशीट दाखल केली जाणार आहे. तसेच या प्रकरणाच्या स्वतंत्र तपासासाठी न्यायाधीशांची नेमणूक केली गेली आहे. तसेच महिला आरपीएस अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

Exit mobile version