Devendra Fadnavis Press Conference : लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर आता लोकल प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. (Fadnavis) वाढलेल्या गर्दीमुळे अशी घटना घडल्याचं समोर आलं आहे. अशातच आता वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांना मुंब्रा येथे झालेल्या अपघाताबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना फडणवीसांनी सांगितले की, कालची घटना गंभीर आहे. मेट्रोचा विस्तार कमी असल्यामुळे लोकलमधील गर्दी जास्त आहे. लोकलला दरवाजे लावले तर व्हेंटीलेशनची व्यवस्था करावी लागेल हे सरकारला माहिती आहे.
फडणवीसांच्या धक्क्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव? त्या बदल्यांना स्थगिती नाही तर
आगामी काळात कालसारखी घटना टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळत बदल करण्यात आला आहे. मात्र खाजगी कार्यालयांमध्ये ते करणं थोडं कठीण आहे. कारण यामुळे कंपन्यांच्या नफा-तोट्यावर परिणाम होतो. मात्र आगामी काळात याबाबत निर्णय होऊ शकतो.
मुंब्रा लोकल अपघातात १३ जण जखमी झाले आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमी कळवा छत्रपती शिवाजी महाराज, ठाणे सिविल रुग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत आहेत. अपघातात जखमी असलेल्या चार रुग्णांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे.
उत्पादन शुल्क विभात भर्ती
राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर या 6 जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. उत्पादन आणि विक्रीसाठी विभागाच्या माध्यमातून एआय आधारित कंट्रोल रूम तयारी केली जाणार आहे.
कोणतं मद्य कितीला मिळणार?
180 मिली मद्य किरकोळ विक्रीची किंमत
देशी मद्य- 80 रुपये
महाराष्ट्र मेड लिकर – 148 रुपये
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य – 205 रुपये
विदेशी मद्याचे प्रमीयम ब्रॅण्ड- 360 रुपये