Devendra Fadnavis : नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपतीने आत्मसमर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत गडचिरोली पोलिसांना एक कोटींच बक्षीस जाहीर केला आहे. माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी तसेच पॉलिट ब्युरो सदस्य आणि अत्यंत वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत गडचिरोली पोलिसांना 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, भूपतीच्या आत्मसमपर्णामुळे नक्षली चळवळीचा कणा मोडला आहे. यासाठी सी 60 जवानांचं विशेष अभिनंदन. आजच्या या घटनेमुळे नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात छत्तीसगड (Naxal commander Bhupathi) येथे आत्मसमपर्ण होणार असल्याची आपेक्षा त्यांच्या (मल्लोजुला वेणुगोपाल) बोलण्यातून आम्हाला जाणवली त्यामुळे आता नक्षलवाद किंवा माओवाद संपुष्टाकडे (Gadchiroli Police) चाललेला आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) , गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राज्यातील गृह मंत्रालयाचे मनापासून अभिनंदन करतो असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भूपती यांची इच्छा होती की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर आत्मसमर्पण करु. याबाबात जेव्हा माझ्या वरिष्ठांनी चर्चा केली तेव्हा मी त्यांना सांगितलं की त्यांनी मला जंगलात देखील बोलवलो तरी देखील मी यायला तयार आहे. पण आपल्या पोलिसांनी त्याला इकडे आणून आत्मसमपर्ण केला आहे म्हणून मी सगळे कार्यक्रम रद्द करून इकडे आलो असल्याची देखील माहिती माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मोठी बातमी , बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रिपद सोडलं