CM Eknath Shinde And Sharad Pawar Frinedship : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची दोन वाक्य नेहमीच राजकारणात महत्वाचे ठरतात, त्यातील पहिलं वाक्य म्हणजे सत्तेचा ताम्रपट कोणी कधीही कायमचा धारण करत नसतो. आणि त्यांचं दुसरं वाक्य असं आहे की, राजकारणामध्ये कोणीही कधीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. आता ही दोन वाक्य आठवण्याचं कारण काय? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
तर या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) रणधुमाळीमध्ये काही ज्या अलिखित नोंदी आहेत. त्याच आता तुमच्या समोर येणार आहेत. पडद्यावरच आणि वृत्तपत्राचं आरोप- प्रत्यारोपांच किंवा आपल्या आश्वासनांचा, जाहीरनामांचं, वक्तव्याचं ट्विट किंवा व्हिडिओ आपण नक्कीच पाहिले असणार आहात. तुम्ही सर्वांनी पाहिले असतील या सर्व बातम्यांमध्ये आरोप प्रत्यारोपण मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) तुटून पडत होते. ‘गद्दार गद्दार’ म्हणून त्यांच्यावर टीका करत होते.
दुसरीकडे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवरती काँग्रेसवरती टीका करत होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे शरद पवार (Sharad Pawar), नाना पटोले (Nana Patole) किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार प्रहार करत होते. उद्धव ठाकरेआणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना वेडपट बनविण्यापर्यंतची भाषा वापरली. या सर्व गदारोळामध्ये एक नोंद तुमच्या लक्षात आली आहे का? ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांबद्दल चकार शब्दही काढलेला नाही.
आता तुम्ही म्हणाल की राष्ट्रवादी काँग्रेस १० जागांवर लढत होत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ जागांवर लढत होती. हे दोघेही आमने- सामने कोणत्याही मतदार संघात नव्हते. मग हे दोघे एकमेकांवर टीका का करतील? पण राजकारण खरोखरच इतकं सोपं असत. खरोखरच आताच जे राज्यसरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालत आहे. शरद पवार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करत होते.
मात्र या सरकारचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक शब्द देखील काढत नव्हते. एकनाथ शिंदे हे देखील शरद पवार यांच्याबद्दल तसेच तू काहीच बोलत होते या विषयाबद्दल त्यांचं देखील मौनचं होतं. हे जे मौन आहे ते नेमकं राजकीय मौन आहे की मैत्रीचं मौन आहे, हे आपल्याला शोधायचं आहे. यासाठी आपल्याला अजित पवारांचं जे पहिले वाक्य आहे, ताम्रपट कधीच कोणाकडे कायम नसतो. आणि राजकारणात कधीच कोणी मित्र आणि क्षत्रू नसतो. एकाचवेळी शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीमध्ये आहेत, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यात त्यांचा सर्वात मोठा वाट राहीला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सर्वाधिक त्रास दिला, त्यांचा पक्ष फोडला त्यांच्याबद्दल शरद पवार एक शब्द देखील काढत नाहीत.
एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका मराठा संघटनेच्या कार्यालयाचं उदघाटनाचे निमंत्रण देण्यासाठी स्वतः शरद पवार हे एकनाथ शिंदेंना भेटायला गेले होते. आणि आता जी राजकारणातील चर्चा सुरु आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून फुटून तुमच्या सरकारमध्ये येत आहेत. यांची पहिली कुणकुण जे शरद पवारांना लागली होती. त्यांनीच ती एकनाथ शिंदेंना या वर्षा बंगल्यावरील भेटीत सांगितलं आहे, अशी चर्चा सर्वत्र राजकीय वर्तुळात आहे. आता प्रत्क्षत शरद पवार आणि शिंदे या दोघांमधील राजकीय चर्चा काय झाली. कोणी सांगू शकत नाही. या दोघांचे सर्वधनाचे संबंध आहेत, हे सर्वांना दिसून येत आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांबद्दल एवढं आदरभाव का दाखवला असेल.
ज्या शरद पवारांचे पुतणे हे शरद पवारांना थेटपणे अंगावर घेत आहेत. एकनाथ शिंदे मात्र आजूनही सौम्यपद्दतीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी वागत आहेत. याची दोन तीन कारणे दिसून येत आहेत. ती अनेकांनी सांगितली आहेत. ज्याच्यामध्ये काही लॉजिक देखील आहे. यांच्यात सर्वात महत्वाचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला किती जागा मिळणार? देशात भाजपची स्थिती नेमकी कशी असणार? हा सगळा उहापोहलं आपल्याला ४ जूनला समजणार आहे. मात्र भाजप एकतर्फी केंद्रात सत्तेवर जे आलं तर स्वाभाविकच राज्यातील समीकरणे बदलणार आहेत. आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातील काही दुरावा किंवा फट अशी काय तयारी होईल का? अशी देखील शंका अनेकांना येत आहे. अनेकांच्या म्हणनानुसार एकनाथ शिंदे यांनी भाजपवर दबाव टाकत १५ जागा पदरात टाकून घेतले आहेत.
पण या जागा प्रत्क्षात किती जिंकून येतील याची खात्री अद्याप भाजपाला नाहीय. ज्या-ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी ते निवडून येतील. मात्र धनुष्यबाणाबद्दल आजूनही भाजपाला खात्री वाटत नाही. आणि भाजप खरोखरच आपल्या वरचढ होणार असेल आणि आपल्याला काही पर्याय शोधायचं असेल तर म्हणून तर एकनाथ शिंदे शरद पवारांशी सौम्य वागत आहेत का काय? याची माहिती नक्कीच आपल्याला ४ जूनला समजणार आहे. आणि समजा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला कमी जागा मिळाले. दुसरीकडे भाजपाला देखील कमी जागा मिळाल्या. प्रतक्ष्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या. आणि भाजपाला असं वाटलं, उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे खरे वारसदार आहेत. एकनाथ शिंदे याना आपण सोबत घेऊन चेक केली आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये काय राहील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देखील ठाकरे कुटूंबाच्या संपर्कात आहेत. त्यांची वैयक्तिक ख्याली खुशाली विचारली जात आहे. पक्ष म्हणून भाजप आणि शिवसेना जरी वेगवेगळे गेले असतील, तरी मोदी आणि ठाकरे यांच्या मधील जो सुसंवादाचा पूण आहे. तो आज देखील कायम आहे. हे देखील मोदींनी जाहीरपणे सांगितले आहे. यांची जेव्हा कुणकुण किंवा याबद्दलची जेव्हा भीती एकनाथ शिंदे यांना आली असेल, तेव्हा देखील त्यांनी एक हादचा एक्का म्हणून शरद पवार यांच्या पक्षाशी सौम्यपणे वागण्याचं ठरवलं असावं, अशी शंका नाकारता येत नाही.
‘अब की बार 400 पार’ घोषणेमुळे दमछाक झाली; पंतप्रधानांचा दाखला देत भुजबळ थेटच बोलले
दुसरीकडे जरी उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून जर पुन्हा भाजपाकडे गेले, तर शरद पवारसाठी एकनाथ शिंदे आज- उद्या उपयोगाचा मोहरा ठरू शकतील. असं देखील शरद पवारांना मनातून वाटत असावं. दुसरी गोष्ट अशी आहे. शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही मराठा समाजाचे आहेत. त्यातही मराठा समाजाचा आंदोलन मनोज जरांगेच्या रूपं उभं राहील. त्यावेळेस सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी पाठबळ दिलं. अशी चर्चा रंगत होती. नंतरच्या टप्प्यामध्ये शरद पवार हेच जरांगे- पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले, असं देखील बोल जाऊ लागलं होत. आणि हा मराठा मुद्दा दोघांमधील कॉमन फॅक्टर होता का? याची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळं पडद्याआड या दोघांमधील नेमकं कस समीकरण आहे. हे आजून देखील पडद्यासमोर आलं नाही. परंतु या दोघांमधील ज्या पद्दतीचं शत्रुत्व उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे.
तसेच ज्या पद्दतीचं शत्रुत्व अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे. तसं शरद पवार विरुद्ध एकनाथ शिंदे असं आजिबात नाही. हे मात्र निश्चित आहे. आता या दोघांनी योगायोगाने म्हणा किंवा सह्स्थेने म्हणा किंवा ठरवून आपआपली जी शस्त्र आहेत. ती एकमेकांच्या विरोधात चालवली नाहीत. आता याच सगळ्याचं अर्थ ४ जून नंतर काय घ्याचा? कसा निघेल? यासाठी आपल्याला निकालाचीच वाट पाहावी लागणार आहे. त्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे तर काळाची पावलं ओळखून आपापल्याला राजकीय खेळ्या करण्यामध्ये माहीर असलेल्या व्यक्ती आहेत. त्यामुळे आगामी भविष्यात काय दडलं आहे. हे आपल्याला नंतर स्पष्ट होईल. मात्र या दोघांमधील मैत्री ज्याची नोंद त्या अर्थाने अधिकृत झालेली नाहीय. मात्र ही मैत्री लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत नक्की पाहायला मिळाली आहे.