Cm Eknath Shinde : छत्रपती शिवरायांची एकदाच काय तर शंभरवेळा माफी मागणार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी माफीनामा जाहीर केलायं. दरम्यान, मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) माफी मागितली मात्र, एकनाथ शिंदे यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मी एकदाच काय तर शंभरवेळा शिवरायांच्या चरणी डोकं ठेवायला तयार असल्याचं स्पष्ट केलंय. मुंबईत ते बोलत होते.
Bigg Boss Marathi : अभिजीत गुरुंनी सांगितलेली ‘बिग बॉस मराठी’ची व्याख्या तुम्ही ऐकली का?
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत दु:खद, दुर्देवी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्यदैवत असून नौदलाने चांगल्या भावनेने पुतळा उभारला पण दुर्देवाने पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत, त्यासाठी लवकरात लवकर पुतळा मजबूतीने उभं राहण्याचा आमचा मानस आहे. विरोधकांना अनेक विषय आहेत राजकारण करायला, विरोधकांनी शिवरायांवरुन राजकारण करु नये, आम्ही शिवरायांच्या चरणांवर एकदा नाही तर शंभरवेळा डोकं ठेवायला तयार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितलीयं.
हिंसाचाराचा इफेक्ट! बांग्लादेशचा कापड उद्योग गडगडला, 4500 कोटी पाण्यात, 900 कारखाने बंद..
तसेच शिवरायांची माफी मागायला आम्हाला कमीपणा वाटणार नाही, कारण त्यांच्याच आदर्शाने आम्ही चालत आहोत. शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी आम्ही नौदल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलीयं. या बैठकीत दोन समितींची स्थापना केलीयं. एक समितीकडून पुतळा दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असून दुसऱ्या समितीत तज्ज्ञ शिल्पकार असणार आहेत. त्यामुळे आता शिवरायांनी विरोधकांना सद्बुद्धी द्यावी, आणि पुतळा पुन्हा कसा उभारेल याचा विचार करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.
13 कोटी जनतेची माफी मागतो…
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते मालवमध्ये जाऊन पाहणी करीत आहेत. काल मालवणमध्ये ठाकरे गट आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळालंय. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवरायांचा पुतळा कोसळ्याच्या दुर्घटनेवरुन मी राज्यातील 13 कोटी जनतेची माफी मागत असल्याचं म्हणत माफी मागितलीयं.