आप्पासाहेबांची जादू पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे, राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निरुपणकार धर्माधिकारींचा गौरव केला आहे. दरम्यान, आज नवी मुंबईत निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
Atiq Ahmed चे मारेकरी म्हणाले, मर भी जाते तो कोई गम नहीं…
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन महाराष्ट्र राज्याचा मान वाढला आहे. महासागरासमोर काय बोलावं कळत नाही. मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही तर श्री परिवारातील सदस्य म्हणून बोलतोय. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी अमित शाह यांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
नगरमध्ये गारांचा पाऊस! अवकाळीने झोडपले, शेती पिकांचे प्रचंड नुकसान
सूर्य आग ओकत असताना एकही माणूस जागेवरुन उठत नाही हे आप्पासाहेबांचे आशिर्वादच आहेत.शिस्तीचे पालन सर्व सदस्य करत आहेत. माझी पत्नी आणि मुलगा श्रीकांत समोर बसला आहे. इथं लहान मोठा कोणी नसल्याचंही ते म्हणाले आहेत. धर्माधिकारी कुटुंबियांनी कायमच भरकटलेल्या माणसांना मार्ग दाखवला आहे. ते एक दिपस्तंभ असून त्यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघात ? ; अभ्यासक पेंडसेंनी केली ‘ही’ मागणी
माझेही लाखो कुटुंबात एक कुटुंब होते, माझ्या परिवारावर दुख: कोसळलं तेव्हा आनंद दिघेंनी मला आधार दिला होता. तर आज आप्पासाहेबांनी मला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची वाट दाखवलीय, त्यांचं योगदान मी कधीही विसरणार नसल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, अमित शाह यांनी कलम 370 रद्द केले तसेच राम मंदिराचे कामही शाह यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या सोहळ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह धर्माधिकारी यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.