नगरमध्ये गारांचा पाऊस! अवकाळीने झोडपले, शेती पिकांचे प्रचंड नुकसान
Unseasonal Rain In Ahhmednagar : दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)राज्याला झोडपून काढले आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवेळी पावसाने पडलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. आज या अवकाळी पावसाचा फटका अहमदनगर (Rain in Nagar) शहरालाही बसला. अहमदनगर शहरात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात बदल होऊन तापमानात घट झाली. अचानक सुरू झालेल्या या पावसाने रस्त्याने जाणारे नागरिक आणि वाहनचालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
शनिवारी दुपारच्या सुमारास शहरातील माळीवाडा, स्टेट बँक चौक, कोठला सॅण्ड, कापडबाजार, बालिकाश्रम रोड, सावेडी उपनगर, तसेच बोल्हेगावसह अन्य भागात गारांचा जोरदार पाऊस झाला. काही वेळातच रस्त्यात पाणी साचले. तसेही पाऊस होईल याचा अंदाज होताच. सकाळपासूनच वातावरण ढगाळ दिसत होते. गार हवाही सुरू होती. त्यानंतर दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास एक ते दीड तास पाऊस झाला. या पावसामुळे शहरात अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
अरविंद केजरीवाल आजचे गांधी! भाजप त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, राघव चढ्ढा यांचा हल्लाबोल
या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. आधीच शहरातील रस्ते प्रचंड खराब झाले असून मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांत जमा झाले. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. वाहनचालकांचेही चांगलेच हाल झाले. पावसाबरोबरच गाराही पडत होत्या. त्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
Sujay Vikhe : ‘काल आलेले नेते विकासाच्या गप्पा मारतात’; विखेंचा लंकेंवर निशाणा..
राज्यात कालपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांसह नगर जिल्ह्याला या पावासाने झोडपून काढले अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब पडले तर शेतात गारांचा खच पडला होता. हजारो रुपये खर्च करून वाढवलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर जमीनदोस्त झाली. कांदा, आंबा, द्राक्षे, टरबूज, संत्रा, गहू, हरभरा अशा सर्वच हाताशी आलेली पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.